Abhijeet Dipke: ‘तुम्ही 10 वर्षात केलं काय?’; सरकारी शाळांची अवस्था पाहून अभिजीत दीपकेंनी केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

हिंगोली आणि उजनी भागातील शाळांना भेटी दिल्यानंतर दीपकेंनी प्रशासकीय निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.

Abhijeet Dipke: ‘तुम्ही 10 वर्षात केलं काय?’; सरकारी शाळांची अवस्था पाहून अभिजीत दीपकेंनी केली ‘या’ मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

Abhijeet Dipke : विद्यार्थ्यांच्या मुलभूत प्रश्नांकडे आणि जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दीपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये सापांचा वावर, तुटलेले पत्रे आणि बसण्यासाठी बेंच नसणे यांसारख्या गंभीर समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हिंगोली आणि उजनी भागातील शाळांना भेटी दिल्यानंतर त्यांनी प्रशासकीय निष्काळजीपणावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची मुले जोपर्यंत एका दिवसासाठी अशा खराब रस्त्यांवरून पायी शाळेत जात नाहीत, तोपर्यंत त्यांना या त्रासाची जाणीव होणार नाही, असा रोखठोक इशारा त्यांनी दिला.

शाळांमधील दुरवस्था आणि राजीनाम्याची मागणी

गेल्या दहा वर्षांत शिक्षण व्यवस्थेत काहीही ठोस बदल झालेला नाही, असा आरोप करत त्यांनी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक भागांत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळांची दशा न सुधारल्यास आणि योग्य त्या सुधारणा न झाल्यास थेट उपोषणाला बसण्याचा आणि गावागावांत आंदोलने उभारण्याचा इशारा दिपके यांनी दिला आहे. शाळांची अशी वाईट स्थिती राहिली तर जबाबदार मंत्र्यांनी पदावर न राहता तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली असून सर्व राजकीय नेत्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवणे बंधनकारक करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

NEET पेपरफुटी आणि CBI तपासावर प्रश्नचिन्ह

NEET पेपर लीक प्रकरणावर बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या तपासावर तीव्र असमाधान व्यक्त केले. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) होत असलेला तपास केवळ वरवरचा वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. बड्या अधिकाऱ्यांच्या आणि वरिष्ठ घटकांच्या सहभागाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर पेपर लीक होणे शक्यच नाही. मात्र, यंत्रणा फक्त खालच्या स्तरातील लहान कर्मचाऱ्यांना पकडून कारवाईचे नाटक करत आहे आणि मूळ सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादावर राऊतांचं सूचत वक्तव्य; शिंदेंवर कोणाचा दबाव?, राऊतांनी स्पष्टच सांगितलं

गावकऱ्यांचे संघटन आणि भावी रणनीती

आपल्या या लढ्यात कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी काम करत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सध्या राजकारणात प्रवेश करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांच्या आणि ग्रामीण शिक्षणाच्या हक्कासाठी हा संघर्ष सुरूच राहील. गावकऱ्यांनी आणि पालकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर जनतेची भक्कम साथ मिळाली तर हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवला जाईल आणि सरकारला यावर ठोस पावले उचलण्यास भाग पाडले जाईल, असा विश्वास दीपके यांनी व्यक्त केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number