Wednesday, February 18, 2026 05:47:07 PM

NCP Merge: राष्ट्रवादी विलीनीकरणाचा पेच वाढला; तटकरेंनंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने ठेवली अटी

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटातील काही नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनि‍करणावर आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे.

ncp merge राष्ट्रवादी विलीनीकरणाचा पेच वाढला तटकरेंनंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याने ठेवली अटी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची अजितदादांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. याला दोन्ही राष्ट्रवादीतील बड्या नेत्यांनीसुद्धा दुजोरा दिला. अजितदादा आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयीची सकारात्मक चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा- Suhas Babar on Fadnavis: "आमच्यामुळेच तुम्ही मुख्यमंत्री" सांगलीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं खळबळजनक विधान; भाजपच्या 'या' नेत्याला दिला इशारा
यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी विलीनि‍करणावर आपली मतं मांडायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावर आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीचा व्हिडिओ फेटाळला.  'हा कृषी प्रदर्शन भरले होते त्यावेळी अजित दादा तीथे गेले त्यांनी पत्रकार परिषद  घेतली होती.त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत चर्चा झाली याची माहिती अजितदादांनी सांगितली', असं सुनील तटकरे म्हणाले होते. 

हेही वाचा- Trade Deal India US: भारत-अमेरिकेत ऐतिहासिक व्यापार करार; पण अमेरिका आता भारताला काय विकणार?
त्यानंतर आता विदर्भातील नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील राष्ट्रवादी विलीनि‍करणावर काही अटी समोर ठेवल्या आहेत. यावेळी धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, "अजितदादा याआधी कधीच आमच्यासोबत विलीनीकरणा संदर्भात काहीच बोलले नाही. विलीनि‍करणाची कोणतीच तारीख ठरली नव्हती, असं असत तर अजितदादांनी आमच्यासोबत चर्चा केली असती. दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे. आम्ही NDA चे घटक पक्ष आहोत. त्यामुळे ज्यांना आमच्यासोबत याचचे असेल त्यांना एनडीएसोबत यावे लागेल". 

हेही वाचा- KDMC New Mayor: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 'राज्याभिषेक'!; सहा वर्षांचा प्रशासकीय वनवास संपला; हर्षाली चौधरी आणि थवील शहराचे नवे कारभारी
यावेळी त्यांनी अटी समोर ठेवत म्हटलं की, "पहिली अट अशी की, आम्ही आमचा नेता निवडला आहे. आमच्या पक्षात शरद पवार यांचा पक्ष विलीन झाल्यावर सुप्रिया ताईंचा रोल काय राहील हे ठरवू. पण नेतृत्व सुनेत्रा ताई यांच्याकडे असेल. दुसरं म्हणजे, शरद पवार गटाने आमच्या पक्षाचे चिन्ह लक्षात ठेवून एकत्र यावं. तिसरं आणि शेवटचं म्हणजे, आम्हाला एनडीए सोबत रहायचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शरद पवारांच्या गटाला एनडीए सोबत यावं लागेल. एनडीएसोबत येत नसेल तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन फायदा नाही" असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी विलीनि‍करणाबाबत तीन अटी शरद पवार गटासमोर ठेवल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री