राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखातंही होतं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे पक्षांची धुरा कोण सांभाळणार, तसेच उपमुख्यमंत्रीपदी कोण बसणार, या सर्व विषयांवर चर्चा रंगू लागल्या आहेत. या दरम्यान, आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अशातच पमुख्यंत्रीपदाचा पेच लवकरात लवकर सुटेल, असे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री पदाचा शपथीविधीसाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबईत उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग मोकळा झाला असून, सुनेत्रा पवार यांच्याकडून उद्याच्या बैठकीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटले यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार झाल्या असून सुनेत्रा पवारच राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार आहेत. यादरम्यान एक मोठा बातमी समोर आली आहे शनिवारी संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी पार पडणार आहे.