Dhule Leopard Attack : चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही बिबट्या मोकाट; पहाटे झोपडीत घुसून महिलेवर हल्ला, धुळ्यात खळबळ

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून ममाने शिवारात पहाटे झोपडीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला

Dhule Leopard Attack : चिमुकल्याचा बळी गेल्यानंतरही बिबट्या मोकाट; पहाटे झोपडीत घुसून महिलेवर हल्ला, धुळ्यात खळबळ

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ममाने शिवारात पहाटेच्या वेळी झोपडीत झोपलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक येत हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, सध्या तिला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला
दरम्यान, अवघ्या काही दिवसांपूर्वी याच शिरपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. 9 सप्टेंबर रोजी बिबट्याने चिमुकल्याला उचलून नेले होते. त्यानंतर वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीमही हाती घेतली होती. बालकाच्या मृत्यूनंतर वनविभागाकडून काही ठिकाणी पिंजरे लावले होते तसेच ड्रोनच्या माध्यमातून बिबट्याचा सर्व परिसरात शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र, अद्यापही बिबट्या पकडला गेला नसताना पुन्हा एका महिलेवर हल्ला झाल्याने परिसरातील प्रत्येक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा-Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीला निर्घृणपणे संपवलं; चेहरा विद्रूप करून टोकाचं पाऊल उचलल्याचा बनाव… पण एक चूक अन् डाव पलटला

शेतशिवारात राहणार शेतकरी, शेतमजून तसेत नागरिकांमध्ये या घनटेमुळे चिंतेचे वातावरण आहे. विशेषतहा रात्री आणि पहाटेच्या वेळी शेतात जाण्यास आता नागरिक घाबरत आहे. बिबट्याच्या सततच्या वावरामुळे शेतातील दररोज होत असलेल्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number