Sambhajinagar Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आलं सत्य

वैजापूर तालुक्यात 13 वर्षीय मुलीशी अनधिकृत विवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी संतोष ठाकरेला अटक करून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

Sambhajinagar Crime News : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेच्या गर्भधारणेनंतर समोर आलं सत्य

विजय चिडे, प्रतिनिधी,

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गंभीर प्रकार उघड झाला असून परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणात संतोष ठाकरे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने 2020 मध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीशी विवाह केला होता. विशेष बाब म्हणजे या विवाहासाठी मुलीच्या आई-वडिलांनीही संमती दिल्याचे तपासात समोर आले आहे. विवाहानंतर ती गरोदर राहिली आणि उपचारासाठी तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या पथकाने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, अनधिकृत विवाह आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित गंभीर कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हेही वाचा: Rohini Acharya : ‘तुम्हाला चपलेनं मारलं जाईल…, त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढलं’; रोहिणी आचार्य यांचे कुटुंबियांबाबत धक्कादायक खुलासे

तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी संतोष ठाकरे याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून मुलीच्या कुटुंबाची भूमिका, विवाहाची पार्श्वभूमी आणि इतर संबंधित गोष्टींचीही पोलिसांकडून बारकाईने तपासणी सुरू आहे. या प्रकरणामुळे वैजापूर तालुका आणि परिसरात संतापाची लाट पसरली असून अल्पवयीन मुलीचे शोषण करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana Update : बहिणींनो तयार व्हा! योजनेबद्दल मोठ्या घोषणेची शक्यता

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number