निकटवर्तीयांना 800 कोटींचे टेंडर; बारस्करांचे जरांगेंवर गंभीर आरोप

भोसले सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांची कंपनी आहे, त्यावर इन्कम टॅक्स, ईडीच्या रेड पडल्या. म्हणून जरांगेंना डिफेन्डर दिली, असा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला आहे.
Ajay Baraskar
Ajay Baraskar

वाळू चोरीसाठी मनोज जरांगेदेखील जबाबदार आहेत. ते देखील गुन्हेगार आहेत. तहसीलदार आणि मनोज जरांगे हे जेलमध्ये जाणार, अशी घणाघाती टीका अजय बारस्कर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बारस्कर यांनी जरांगेंची पोलखोल केली. त्यांनी पुढे नमूद केले की, मी त्यांना जेलमध्ये टाकून राहणार, असा आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षण अभ्यासक अजय महाराज बारस्कर यांनी हल्लाबोल केला आहे. माझ्या तक्रारची दखल घेत 4 दिवसांपूर्वी आदेश आमच्या हातात आला आहे. मनोज जरांगे यांनी यांनी आता यावर उत्तर दिल पाहिजे. पण मनोज जरांगे सरकारचा पाळीव कुत्रा आहे. मी पत्रकारांपासून काही लवपत नाही असं ते म्हणाले. मग पत्रकारांना का बैठकीच्या वेळी बाहेर ठेवलं? जरांगे एक नंबरचा चोर माणूस आहेत, अशी टीकाही अजय बारस्कर यांनी केली आहे. जरांगेला डिफेन्डर गाडी कोणी दिली? आरक्षण लढाई जिंकली नाही, मग कशाला हार घालायचा आहे. डिफेन्डर उगाच कोणी कोणाला देतं नाही. भोसले सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांची कंपनी आहे, त्यावर इन्कम टॅक्स, ईडीच्या रेड पडल्या. म्हणून तुला डिफेन्डर दिली, असा गंभीर आरोपही बारस्कर यांनी केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version