Sunday, July 13, 2025 10:31:41 AM

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवार गटाच्या निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अनुसूचित जाती-जमाती व इतर मागास प्रवर्गात आघाडी निर्णायक, चौरंगी लढतीत रंगत वाढली.

माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर

बारामती: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणी प्रक्रिया सोमवार (23 जून) रोजी सकाळी 9 वाजता सुरू झाली असून, ती अद्याप सुरूच आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण दोन फेऱ्यांपैकी पहिली फेरी रात्री 9 वाजेपर्यंत पूर्ण होईल. दुसरी फेरी रात्री 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, निकाल पहाटे 5 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील श्री नीलकंठेश्वर पॅनल आघाडीवर असून, त्यांचे तीन पुरुष उमेदवार आणि एक महिला उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, चंद्रराव तावरे यांच्या पॅनलची एक महिला उमेदवार आघाडीवर आहे.

प्रत्येकी आघाडीवर व पिछाडीवर असलेले उमेदवार (आतापर्यंतची मते)

1) अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ (एकूण मते : 8316)

  • भोसले रत्नकुमार साहेबराव – 4117 (आघाडीवर)

  • गायकवाड बाबुराव अप्पा – 3717

  • भोसले राजू श्रीरंग – 417

  • सातपुते प्रताप पांडुरंग – 50

  • भोसले अर्जुन सीताराम – 15

2) इतर मागास प्रवर्ग (एकूण मते : 8153)

  • शेंडे नितीन वामनराव – 4120 (आघाडीवर)

  • नारळी रामचंद्र कोंडीबा – 3644

  • बनकर भरत दत्तात्रय – 437

  • बनसोडे अरविंद भीमदेव – 152

3) भटक्या जाती-जमाती प्रवर्ग

  • विलास ऋषिकांत देवकाते (अजित पवार गट) – 4269 (आघाडीवर)

  • सूर्याजी तात्यासो देवकाते (तावरे गट) – 3288

  • ज्ञानदेव बुरुंगले (शरद पवार गट – तुतारी) – 566

  • भुते बाळासो रामचंद्र – 66

  • देवकाते अनिकेत अजितकुमार – 24

  • देवकाते आबासो पांडुरंग – 61

4) महिला राखीव प्रवर्ग (एकूण मते : 8599)

  • संगीता बाळासाहेब कोकरे (अजित पवार गट) – 2161

  • राजश्री कोकरे बाबुराव (तावरे गट) – 2022

  • मुलमुळे ज्योती मच्छिंद्रनाथ (अजित पवार गट) – 1959

  • गावडे सुमन कृषिराम – 1545

  • निगडे प्रमिला पोपट – 199

  • तावडे पुष्पा मोहनराव – 156

  • कोकरे शकुंतला शिवाजी – 461

  • कोकरे संगीता भारत – 46

  • कोकरे संगीता दत्तात्रय – 53

5) 'ब' वर्ग प्रवर्ग (एकूण मते : 101)

  • अजित अनंतराव पवार – 91 (विजयी)

  • देवकाते भालचंद्र बाबुराव – 10

अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून, बहुतेक मतदारसंघांमध्ये त्यांच्या उमेदवारांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. अंतिम निकाल पहाटेपर्यंत येण्याची शक्यता असून, कारखान्याच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.

 


सम्बन्धित सामग्री