Ajit Pawar Last Video: अजितदादांचा विमान अपघाताआधीचा ‘तो’ शेवटचा व्हिडिओ आला समोर; काय म्हणाले होते ? पाहा

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघण्यापूर्वी त्यांनी जनतेला केलेले हे शेवटचे आवाहन आता सर्वांना भावूक करत आहे.<br/>

Ajit Pawar Last Video: अजितदादांचा विमान अपघाताआधीचा ‘तो’ शेवटचा व्हिडिओ आला समोर; काय म्हणाले होते ? पाहा

Ajit Pawar Last Video: महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने राज्यातील जनता अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही. अशातच, त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीचा एक व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघण्यापूर्वी त्यांनी जनतेला केलेले हे शेवटचे आवाहन आता सर्वांना भावूक करत आहे.

शेवटच्या व्हिडिओत अजित पवार काय म्हणाले?
अपघाताच्या काही वेळ आधी चित्रित केलेल्या या व्हिडिओमध्ये अजित पवार नेहमीच्या स्पष्टवक्तेपणात मतदारांना साद घालताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “मी शब्दाचा पक्का आहे आणि कामाचा माणूस आहे. दिलेला शब्द पाळणे हीच माझी ओळख आहे,” असे म्हणत त्यांनी आपल्या कामाच्या पद्धतीचा पुनरुच्चार केला. ग्रामीण भागाचा विकास हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनच होतो. पाणी, रस्ते, शेती आणि रोजगार हे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. “तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,” असा शब्द त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मतदारांना दिला होता.

हेही वाचा – Parth Pawar : टेंशन कायम! पार्थ पवार यांना क्लिनचीट नाही; अहवाल सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ

प्रचारासाठी निघतानाच काळाचा घाला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘घड्याळा’ला साथ देण्याचे आवाहन केल्यानंतर अजित पवार बारामतीच्या प्रवासाला निघाले होते. याच प्रवासादरम्यान त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. हा व्हिडिओ त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यासाठी तयार केला होता, मात्र तो त्यांच्या आयुष्यातील ‘अंतिम संदेश’ ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

व्हिडिओतील महत्त्वाचे आवाहन
व्हिडिओच्या शेवटी अजित पवार हात जोडून नमस्कार करताना दिसतात. “गावाच्या समृद्धीसाठी तुमचं एक मत महत्त्वाचं आहे, राष्ट्रवादीला संधी द्या,” असे ते पोटतिडकीने सांगत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. 

(टीप – या व्हिडिओची जय महाराष्ट्र न्यूज चॅनेल पुष्टी करत नाही.)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number