Saturday, February 14, 2026 03:08:51 AM

Ajit Pawar Death: अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुनेत्रा पवारांचे सांत्वन

या कठीण प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती येथे धाव घेऊन सुनेत्रा पवार तसेच पवार कुटुंबियांच सांत्वनपर भेट घेतली.

ajit pawar death अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सुनेत्रा पवारांचे सांत्वन

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या कठीण प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती येथे धाव घेऊन सुनेत्रा पवार तसेच पवार कुटुंबियांच सांत्वनपर भेट घेतली. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे सांत्वन करताना दोन्ही नेते भावूक झाले होते. या भेटीचा फोटो समोर आला आहे. 

दिल्लीहून पवार कुटुंबीय तातडीने रवाना
संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीत होत्या. मात्र, अपघाताची बातमी समजताच त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. बारामतीमध्ये दाखल होताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांची भेट घेऊन संपूर्ण पवार कुटुंबाला धीर दिला. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि योगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते. सण-उत्सवाच्या निमित्ताने नेहमी एकत्र दिसणाऱ्या या मोठ्या कुटुंबावर आज नियतीने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Death: मुंडे, मेटे आणि पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र सुन्न! अपघातांनी हिरावले महाराष्ट्रातील तीन प्रभावी लोकनेते

बारामतीत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच केवळ बारामतीतूनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेतली आहे. आपल्या लाडक्या 'दादां'ना गमावल्याच्या भावनेने कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. "आमचा आधारवड गेला," अशी भावना व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडला. प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्रशासकीय आणि राजकीय स्तब्धता
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली तेव्हाचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. राजकीय मतभेद बाजूला सारून सर्वपक्षीय नेते पवार कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहेत. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबतचे निर्णय पवार कुटुंबियांच्या चर्चेनंतर घेतले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या