Akola Accident News: अकोल्यात भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले अन् 11 जण गंभीर जखमी तर…

वाहन पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Akola Accident News: अकोल्यात भीषण अपघात! मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले अन् 11 जण गंभीर जखमी तर…

अकोला जिल्ह्यात शनिवारी रात्री एक हादरवून टाकणारी दुर्घटना घडली असून कापूस वेचणीचे काम आटोपून परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. मध्य प्रदेशातून रोजगारासाठी आलेल्या मजुरांचे वाहन रस्त्याच्या कडेला उलटल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि हळहळीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बन्हाणपूर येथील रहिवासी असलेले मजूर कपिलेश्वर परिसरातील एका शेतात कापूस वेचणीसाठी आले होते. काही दिवसांपासून हे मजूर आपातापा परिसरात वास्तव्यास होते. शनिवारी दिवसभर कष्टाचे काम केल्यानंतर सायंकाळी सर्व मजूर एका वाहनातून आपल्या घरी परतत होते. या भीषण अपघातात मुन्नीबाई जांभेकर आणि मनिष कासदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित 11 मजूर गंभीर जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींच्या आक्रोशाने परिसर सुन्न झाला होता.

हेही वाचा: Delhi Air Pollution: दिल्लीतील हवा धोक्याच्या पातळीवर; ऑफिस कामकाजासाठी 'वर्क फ्रॉम होम' तर शाळांसाठी 'हायब्रिड' वर्गांचे आदेश

दरम्यान, खरप बुद्रुक ते घुसर रस्त्यावर विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊसजवळ अचानक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. क्षणातच वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले. अपघात इतका जबरदस्त होता की वाहनातील काही मजूर हवेत उडून थेट रस्त्यावर आदळले. काही क्षणांत आनंदाने भरलेला प्रवास मृत्यूच्या थरारात बदलला.

घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक पराग गवई हे तातडीने मदतीसाठी तिथे पोहचले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासात वाहनाचा वेग जास्त असल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा: Share Market Holidays 2026: पुढच्या वर्षी शेअर बाजार 'इतक्या' दिवस बंद राहणार; NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number