Mumbai CJP Protest : …अन् विद्यार्थी क्षणात पोलिसांच्या ताब्यातून मुक्त झाले; चेंबूरमधील आंदोलनाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईच्या चेंबूरमध्ये झालेल्या आंदोलनाची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai CJP Protest : …अन् विद्यार्थी क्षणात पोलिसांच्या ताब्यातून मुक्त झाले; चेंबूरमधील आंदोलनाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद देशभर उमटू लागले. दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनामुळे शिक्षण, परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर देशभरात व्यापक चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील CJP आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून देशभरात चर्चा सुरू आहे. राजधानी दिल्लीत सुरू झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आता देशाच्या विविध भागांत पसरली आहेत.

हेही वाचा- Divija Fadanvis On CJP Protest : “आंदोलन खरं, सरकार जबाबदार”, नीट पेपरफुटीच्या आंदोलनावर फडणवीसांच्या लेकीची भूमिका समोर; इन्स्टास्टोरी चर्चेत

मुंबईतील आंदोलनांप्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल झाले असून सुमारे 400 जणांवर काल झालेल्या आंदोलन प्रकरणी 22 जुलै रोजी दिवसभरात कारवाई करण्यात आली. अशातच काल मुंबईच्या चेंबूरमध्ये झालेल्या आंदोलनाची एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीट पेपरफुटीचे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या पोलिसांच्या पिंजरा बसची एका विद्यार्थ्याने कडी काढली.

त्यामुळे आतमधील सर्व विद्यार्थ्यांनी संधीसाधून बसमधून पळ काढला. तर दुसरीकडे दादरच्या सेना भवन समोर एका बसमध्ये विद्यार्थ्यांना भरल्यानंतर एकट्या मुलीने थेट पोलिसांच्या बसला अडवलं आणि आपल्या सहकारी आंदोलकांना सोडण्याची मागणी केली. या दोन व्हिडिओनी सोशल मीडियावर सध्या धुमाकुळ घातला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number