राज्यात 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा राज्य सरकारने अंमलबजावणी केली आहे. राज्य सरकारच्या या मराठी सक्तीच्या निर्णयाला सुमारे 15 लाख अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी विरोध दर्शवला आहे. या विरोधात येत्या 4 मे पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा या चालकांनी दिला आहे. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि अमराठी रिक्षाचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी अमित ठाकरे म्हणाले की, “मोर्चादरम्यान ज्या महिलेने ते केल ते अगदी योग्य केल हे माझ वैयक्तिक म्हणणं आहे. पक्षाच म्हणणं आहे ते राजसाहेब मांडतीलच. पण कुठलाही हेतू नसताना आंदोलन करणे योग्य नाही.. आंदोलन करण्यासाठी हेतू महत्वाचे असतात. पण तो इथे दिसला नाही. भाजपला आपला पराभव पचवता आला नाही, निवडणुका बघून अशी आंदोलन जाणूनबुजून केली जातात. आता हा थोडासा बदल झालाय त्यासाठी सगळ्यांचे आभार. सरकाराने रिक्षा टैक्सी चालकांसंदर्भात मराठी सक्तीचा घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे. सक्ती करणे अडचणीच अजिबात ठरणार नाही. सरकारचे त्यासाठी अभिनंदन….ज्यांना संपावर जायचे आहे त्यांनी जाव काहीही फरक पडणार नाही.
ज्यांना आंदोलन करायच आहे करा, पण आमच्या लोकांच्या अंगावर आलात की मराठी रिक्षा चालकांच्या अंगावर आलात तर आम्ही तुम्हाला रस्त्यावर मारणार. शांतपणे संप करा काहीही फरक पडणार नाही. आमचे मराठी रिक्षाचालक सक्षम आहेत ते म्हणालेत की उशिरापर्यंत रिक्षा चालवू पण लोकांना त्रास होऊ देणार नाही. प्राधान्य मराठी माणसाला दिल पाहिजे. ज्यांना मराठी येत त्यांनाही प्राधान्य द्यायला हव. आम्ही मराठी बोलणार नाही आम्ही प्रयत्न करणार नाही असा माज दाखवणाऱ्यांना नाही. मोर्चादरम्यान ज्या महिलेने ते केल ते अगदी योग्य केल हे माझ वैयक्तिक म्हणणं आहे. पक्षाच म्हणणं आहे ते राजसाहेब मांडतीलच. पण कुठलाही हेतू नसताना आंदोलन करणे योग्य नाही.. आंदोलन करण्यासाठी हेतू महत्वाचे असतात. पण तो इथे दिसला नाही. भाजपला आपला पराभव पचवता आला नाही, निवडणुका बघून अशी आंदोलन जाणूनबुजून केली जातात.”