Amravati: FDA चं मोठं धाडसत्र सुरू, आता औषध साठ्यावर छापा; अमरावती जिल्हा परिषदेत लाखोंचा साठा कालबाह्य!, कालबाह्य औषधांनी गरिबांच्या जीवाशी खेळ!

Medicine Raid
Medicine Raid

आतापर्यंत FDA च्या कारवाया या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, मिठाई-जंक फूड गाड्या आणि मोठमोठ्या फूड ब्रँड्सवर होत होत्या. मात्र आता थेट औषधांवर देखील गंभीर कारवाई करण्यात आली आहे. अमरावतीमधील जिल्हा परिषदेत लाखो रुपयांचा औषध साठा कालबाह्य असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
सामान्यांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार FDA च्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे.

नेमकं काय घडलं?
अमरावती जिल्हा परिषदेच्या औषध भांडार गृहाची FDA ने अचानक तपासणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. तपासणीत अडगळीत लाखो रुपयांचा औषध साठा पडून असल्याचे आढळले. हा साठा सामान्य आणि गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यासाठी आला होता. मात्र वेळेत वितरित न झाल्याने तो कालबाह्य झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारातील एका कोपऱ्यात हा साठा अडगळीत पडल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने केली होती. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने धाड टाकून ही कारवाई केली. औषधांच्या माध्यमातून सामान्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version