Monday, March 09, 2026 08:28:14 AM

Amravati Accident : अमरावती हादरली! ST बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक; शाळकरी मुलासह 4 जणांचा करुण अंत

भरधाव एसटी बस आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका शाळकरी मुलासह एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला.

amravati accident  अमरावती हादरली st बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक शाळकरी मुलासह 4 जणांचा करुण अंत

Amravati Accident : अमरावती जिल्हातील वरुड-राजुरा बाजार मार्गावर आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. भरधाव एसटी बस आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात एका शाळकरी मुलासह एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचा घटनाक्रम 
मिळालेल्या माहितीनुसार, वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील काही विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक एका रिक्षाने वरुडच्या दिशेने जात होते. दरम्यान, राजुरा बाजार रोडवर समोरून येणाऱ्या एसटी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

हेही वाचा - Colaba Walking Plaza: कुलाब्याचा कायापालट! या ऐतिहासिक जागी होणार 'इंटरनॅशनल स्टँडर्ड' वॉकिंग प्लाझा; पाहा काय असेल खास?

मृतांची आणि जखमींची माहिती 
या अपघातात 4 जणांनी आपला जीव गमावला आहे, ज्यामध्ये एका निष्पाप विद्यार्थ्याचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात जखमी झालेल्या 3 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांची धाव आणि पोलीस तपास 
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे.


सम्बन्धित सामग्री