दसरा आणि दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने होणार गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिलेला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते अध्योध्या कॅन्ट या दरम्यान तब्बल 24 फेस्टिवल विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या अत्याधुनिक अमृत भारत रेकसह धावणार आहेत.
असे असेल या गाड्यांचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01045 लोकमान्य टिळक टर्मिनस ते अयोध्या कॅन्ट ही ट्रेन 19 ऑक्टोबर पासून सुरु झाली असून पुढील महिन्याच्या 27 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ठिक 7.35 वाजता एलटीटीवरुन सुटणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10.15 वाजता अयोध्येला पोहोचेल. अशा एकूण या गाडीच्या 12 फेऱ्या होणार आहेत.
तर परतीची गाडी क्रमांक 01046 अयोध्या कॅन्ट ते एलटीटी ही 20 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी मुंबईत दाखल होईल, अशी माहिती समोर आलेली आहे.
‘हे’ असतील थांबे
महत्त्वाचे म्हणजे, या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, प्रतापगड तसेच सुलतानपूर येथे थांबा देण्यात आलेला आहे. अमृत भारत ट्रेनमध्ये आठ स्लीपर कोच, 11 जनरल कोच, 1 पॅन्ट्री तसेच 2 गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.
हेही वाचा- दिवाळीत विद्यार्थ्यांना किती दिवसांची सुट्टी मिळणार? शिक्षण विभागाकडून तारखा जाहीर
तिकीट कसं बुक कराल?
या गाड्यांचे आरक्षण IRCTC या वेबसाईटवर आणि आरक्षण केंद्रावर सुरु झालेले आहे तर जनरल तिकीटासाठी युटीएस आणि रेलवन या अॅपचा वापरही करता येणार आहे.