Nashik Accident : भीषण अपघात! गाडीवरील नियंत्रण सुटल्याचे अपघात झाल्याची स्थानिकांची माहिती; चालकाचा मृत्यू, तर 5 ते 6 जण जखमी
नाशिक : सिन्नर तालुक्यात पांचाळे सोमठाणे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 6 वाजता हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून इतर 5 ते 6 जण जखमी झाल्याचे समजते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती येथील स्थानिकानी दिली. परिणामी, जीप गाडी रस्त्याच्या कडेला पलटली असल्याचे पाहालयाल मिळत आहे. तसेच गाडीचे पार्टही सर्वत्र विखुरल्याचे दिसून […]
नाशिक : सिन्नर तालुक्यात पांचाळे सोमठाणे रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी पहाटे 6 वाजता हा अपघात झाल्याचे समजते. या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून इतर 5 ते 6 जण जखमी झाल्याचे समजते. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती येथील स्थानिकानी दिली. परिणामी, जीप गाडी रस्त्याच्या कडेला पलटली असल्याचे पाहालयाल मिळत आहे. तसेच गाडीचे पार्टही सर्वत्र विखुरल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी याधीही अपघात झाल्याचे स्थानिक सांगतात. त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. येथे वळण घेताना दिशादर्शक फलक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा : Gold-Silver Rate : सणासुदीच्या काळात चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक! चांदीच्या दरात 10 हजारांची उसळी, तर सोन्याचे दर 6 हजारांनी…