दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अंबाबाईला आर्त हाक; शालेय फलकावरून मांडली व्यथा

रंगीत खडूंतून साकारली बळीराजाची वेदना, देवीच्या चरणी मागितली दुष्काळातून मुक्तता!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची अंबाबाईला आर्त हाक; शालेय फलकावरून मांडली व्यथा

नाशिक नवरात्रोत्सव 2026 निमित्त शिक्षण मंडळ भगूर संचलित नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव येथील शालेय दर्शनी फलकावर कलाशिक्षक श्री. देव हिरे यांनी रंगीत खडूंच्या माध्यमातून हृदयस्पर्शी चित्र साकारले आहे.

दुष्काळाच्या संकटात होरपळणारा शेतकरी मदतीसाठी अंबाबाईच्या चरणी धाव घेत असल्याचे प्रभावी चित्रण यात करण्यात आले आहे.

हेही वाचा – नवरात्रीनिमित्त ठाणे-कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल! काही मार्गांवर नो एन्ट्री; पर्यायी मार्ग कोणते, जाणून घ्या

‘आज आम्हावरी संकट भारी, धावत ये लवकरी…’ या आर्त हाकेतून शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यात आली आहे. तर ‘कोरड्या मातीतही आशेची बीजं जिवंत आहेत…’ या संदेशातून प्रतिकूल परिस्थितीतही आशा न सोडणाऱ्या बळीराजाची व्यथा आणि श्रद्धा अधोरेखित करण्यात आली आहे.

रंगीत खडूंचा आकर्षक वापर, देवीचे देखणे रूप आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील वेदना यामुळे हे फलकचित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दुष्काळग्रस्त वास्तवाचे दर्शन घडवणारे हे कलात्मक फलकचित्र समाजमनाला भावनिक साद घालत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version