Paratwada Case: मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या अयानचं आणखी एक काळं कृत्य उघड; आईचे दागिने चोरले अन्…

मुख्य आरोपी अयान अहमद याने केवळ बाहेरील मुलींचेच आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर स्वतःच्या घरातही चोरी करून आईचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

Paratwada Case: मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या अयानचं आणखी एक काळं कृत्य उघड; आईचे दागिने चोरले अन्…

Paratwada Case: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या परतवाडा येथील तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने केवळ बाहेरील मुलींचेच आयुष्य उद्ध्वस्त केले नाही, तर स्वतःच्या घरातही चोरी करून आईचे दागिने लंपास केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. महागडे मोबाईल आणि आलिशान हॉटेलमधील पार्ट्यांचे वेड पूर्ण करण्यासाठी त्याने गुन्हेगारीचा मार्ग पत्करला होता.

इन्स्टाग्रामवरील रिल्सचे सत्य आले समोर
अयान अहमदला सोशल मीडियावर ‘शो-ऑफ’ करण्याची मोठी हौस होती. इन्स्टाग्रामवरील रिल्समध्ये तो नोटांचे बंडल आणि महागड्या वस्तू दाखवून आपण खूप श्रीमंत असल्याचे भासवत असे. मात्र, या श्रीमंतीमागचे काळे सत्य आता पोलिसांनी शोधून काढले आहे. त्याने आपल्या आईचे सोन्याचे मंगळसूत्र आणि हार चोरून विकला होता. त्यातून मिळालेल्या पैशांवर तो मजा-मस्ती करत असे. या व्यतिरिक्त त्याच्यावर मोठे कर्जही झाले होते, जे फेडण्यासाठी त्याने तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण आणि ब्लॅकमेलिंग सुरू केले होते.

पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता
अयान अहमद आणि त्याचा साथीदार हुजेर खान यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. आज दुपारी त्यांना अचलपूर न्यायालयात हजर केले जाईल. अश्लील व्हिडीओ नेमके कोणाला पाठवले आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तांत्रिक तपास अद्याप बाकी आहे. त्यामुळे पोलीस आज न्यायालयाकडे अधिकच्या कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा – Mumbai Extortion Case : व्यापाऱ्याला 3.25 कोटींचा गंडा; आधी गुंतवणुकीचा बहाणा आणि नंतर बंदुकीचा धाक दाखवून लुटलं, 9 जणांवर गुन्हा दाखल

पीडितांनी समोर येण्याचे पोलिसांचे आवाहन
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेक तरुणी या टोळीच्या जाळ्यात अडकल्या असल्याची चर्चा आहे. मात्र, बदनामीच्या भीतीने आतापर्यंत केवळ एकाच मुलीने तक्रार दाखल केली आहे. इतर पीडितांनी न घाबरता पुढे यावे, त्यांचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. पुराव्यांची साखळी मजबूत करण्यासाठी पीडितांची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number