Sanjay Shirsat: ‘इम्तियाज जलील यांनाही अटक करा…’; कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संजय शिरसाटांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

Sanjay Shirsat: ‘इम्तियाज जलील यांनाही अटक करा…’; कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी संजय शिरसाटांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sanjay Shirsat: नाशिक येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला एमआयएम (MIM) नगरसेवक मतीन पटेल याने आश्रय दिल्याचा आरोप झाल्यानंतर, आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “निदा खान हा केवळ एक मोहरा असून, तिला पाठिंबा देणाऱ्या इम्तियाज जलील यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून तातडीने अटक करावी,” अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.

“निदा खान निर्दोष आहे हे सांगणारे जलील कोण?” – शिरसाट यांचा सवाल
संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. “निदा खान निर्दोष आहे हे ठरवणारे इम्तियाज जलील कोण आहेत? ती संभाजीनगरला कशी आली आणि एमआयएम नगरसेवकाच्या घरी कशी राहिली, याची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची घेणार असून, या संपूर्ण कटामागच्या सूत्रधारांना गजाआड करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरोपी आणि दोषीमध्ये फरक असतो; जलील यांचे प्रत्युत्तर
दुसरीकडे, इम्तियाज जलील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यामागे राजकारण असल्याचे म्हटले आहे. “निदा खान ही सध्या केवळ एक आरोपी आहे, दोषी नाही. आरोप कुणीही कुणावरही करू शकतं, पण ते सिद्ध झाल्याशिवाय ती व्यक्ती गुन्हेगार ठरत नाही,” असे जलील यांनी नमूद केले. तसेच, “निदा खानने माझ्याकडे मदत मागितली असती तर मी देखील तिला मदत केली असती. पोलीस चौकशीत मी पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे, मग ते नाशिक पोलीस असोत किंवा संभाजीनगर पोलीस,” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा – Nitesh Rane On Corporate Jihad: ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणी नितेश राणेंचा खळबळजनक आरोप; MIM ची नोंदणी रद्द करण्यासह केली ‘ही’ मोठी मागणी

एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल; तपासाला वेग
नाशिक पोलिसांनी यापूर्वीच एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निदा खानला लपवून ठेवल्याचा आणि या प्रकरणातील धागेदोरे एमआयएमशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता या वादात राज्याचे पालकमंत्री आणि एमआयएमचे माजी खासदार आमनेसामने आल्याने छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही बाजूंकडून होत असलेल्या आरोपांमुळे आता पोलीस या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number