Friday, March 13, 2026 07:45:54 AM

Pune Police Recruitment : पुण्यात पोलीस भरतीसाठी तब्बल 1.85 लाख अर्ज दाखल; विविध पदांकरता मैदानी चाचण्या सुरू

गेल्या काही वर्षांपासून प्रलबिंत असलेल्या राज्यातील पोलीस भरतीला आता सुरूवात झाली आहे.

pune police recruitment  पुण्यात पोलीस भरतीसाठी तब्बल 185 लाख अर्ज दाखल विविध पदांकरता मैदानी चाचण्या सुरू

रोहन कदम, प्रतिनिधी 

पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रलबिंत असलेल्या राज्यातील पोलीस भरतीला आता सुरूवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून आता पुण्यातही पोली भरतीसाठी चाचण्या सुरू करण्यता आल्या आहेत. पुणे शहर पोलीस भरतीसाठी तब्बल 1.85 लाख अर्ज दाखल झाले होते. पोलीस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनच्या मैदानावर भरतीची ही मैदानी चाचणी करण्यात येत आहे. या भरतीत पोलीस अंमलदार, 105 वाहनचालक आणि 33 पोलीस बँड कर्मचारी अशा एकूण 1633 पदांचा तसेच कारागृह पोलिसांच्या 130 पदांचा समावेश करण्यात आला आहे. मैदानी तसेच शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. शारीरिक चाचणीत उमेदवारांची उंची मोजणी, 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी 800 मीटर) आणि गोळाफेक अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या चाचणीसाठी 100 गुण असून त्यात किमान 50 गुण मिळवणे आवश्यक आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण शारीरिक चाचणी Radio Frequency Identification (RFID) तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली घेण्यात येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला उमेदवार मैदानी चाचणीसाठी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Ajit Pawar Plane Crash Update: अजितदादांच्या विमानातील दोन्ही रेकॉर्डर्सवर आगीचा परिणाम; परदेशातील तंत्रज्ञांच्या मदतीने उलगडणार विमानातील शेवटच्या क्षणांचं सत्य


सम्बन्धित सामग्री