Saturday, June 06, 2026 10:48:08 AM

Ashok Kharat Case : 160 GB डेटा, A, B, C कोडवर्ड, ‘A’ मधून मिळाली चक्रावणारी माहिती; खरातभोवतीचा फास अधिक घट्ट

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. खरात प्रकरणासाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासातून खरातच्या कारनाम्यांचा आणखी एक काळा चेहरा समोर.

ashok kharat case  160 gb डेटा a b c कोडवर्ड ‘a’ मधून मिळाली चक्रावणारी माहिती खरातभोवतीचा फास अधिक घट्ट

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. खरात प्रकरणासाठी नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या तपासातून खरातच्या कारनाम्यांचा आणखी एक काळा चेहरा समोर आला आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर एसआयटी पथकाने त्याच्या बंगल्यावर आणि ऑफिससह विविध ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान एसआयटीच्या हाती लागलेल्या डिजीटल उपकरणांमधून खरातचे धक्कादायक सत्य बाहेर आले आहे.

हेही वाचा- Nashik Corporate Jihad Case : "फूस लावून हिंदूचे धर्मांतर, 40 पेक्षा जास्त CCTV..." वेशांतर करून पोलिसांनी केला भांडाफोड; 'त्या' आयटी कंपनीत नेमकं काय व्हायचं?

अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील मुख्य कार्यालयातील छापेमारीदरम्यान पोलिसांनी लॅपटॉप, 32GB + 16 फोल्डर डेटा, दोन पेन ड्राईव्ह आणि 64GB क्षमतेचे ओटीजी (OTG) डिव्हाईस जप्त केले आहेत. या उपकरणांच्या फॉरेन्सिक अहवालातून तब्बल 160 GB डिजिटल पुरावे उघड झाले आहेत. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आला असून खरात प्रकरणाच्या तपासाला वेग लागला आहे. यावेळी एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे.

त्यातून प्रत्येक पुराव्याला A, B, C कोडवर्ड दिल्याचे समोर आले आहे. यातील ‘A’ नावाच्या फोल्डरमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत देणारे काही व्हिडिओ आणि अशोक खरातने केलेल्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा आणि संवादांचा समावेश आहे. हा संपूर्ण डाटा नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील हालचालींचा तपशील असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या पुराव्यांमुळे खरातभोवतीचा फास अधिक घट्ट झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री