MPSC Exam New Changes: स्पर्धा परीक्षार्थींनो सावधान! MPSC च्या उत्तरपत्रिकेत आता 5 पर्याय; उत्तर न सोडवल्यास ‘इतके’ गुण कापले जाणार

पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मूल्यमापनात गोपनीयता राखण्यासाठी हे बदल करण्यात आले असून, 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांना हे नवीन नियम लागू होतील.<br/>

MPSC Exam New Changes: स्पर्धा परीक्षार्थींनो सावधान! MPSC च्या उत्तरपत्रिकेत आता 5 पर्याय; उत्तर न सोडवल्यास ‘इतके’ गुण कापले जाणार

MPSC Exam New Changes: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीत आणि उत्तरपत्रिकेच्या स्वरूपात क्रांतिकारी बदल केले आहेत. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मूल्यमापनात गोपनीयता राखण्यासाठी हे बदल करण्यात आले असून, 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांना हे नवीन नियम लागू होतील.

पाचवा पर्याय ठरणार अनिवार्य

आयोगाच्या नवीन नियमानुसार, आता प्रत्येक प्रश्नासाठी चार ऐवजी पाच पर्याय दिले जातील. पहिल्या चार पर्यायांपैकी उत्तर माहित नसल्यास, उमेदवाराला पाचवा पर्याय (उदा. 'उत्तर माहित नाही' किंवा 'पर्याय निवडायचा नाही') निवडणे बंधनकारक असेल. जर उमेदवाराने पाचपैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर त्या प्रश्नासाठी 25 टक्के गुण (Negative Marking) कापले जातील. थोडक्यात, आता कोणताही प्रश्न 'कोरा' सोडता येणार नाही.

हेही वाचा – Readable Prescription Handwriting : आता डॉक्टरांना 'सुवाच्य अक्षरात' औषधांची नावे लिहावी लागणार; NMCचे वैद्यकीय महाविद्यालयांना कडक आदेश

उत्तरपत्रिकेचे 'दोन भाग' आणि गोपनीयता

परीक्षेतील पारदर्शकता जपण्यासाठी आयोगाने उत्तरपत्रिकेची (OMR Sheet) दोन भागात विभागणी केली आहे:

भाग 1: यामध्ये केवळ प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी वर्तुळे असतील.
भाग 2: यामध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय सांकेतांक आणि स्वाक्षरी यांसारखी वैयक्तिक माहिती असेल. परीक्षा संपल्यानंतर पर्यवेक्षक हे दोन्ही भाग वेगळे करतील, जेणेकरून पेपर तपासताना उमेदवाराची ओळख गुप्त राहील.

हेही वाचा – Year Ender 2025: शाळांची फी ते कोचिंग सेंटर्सचे नियम ; 2025 मधील शिक्षण क्षेत्राचा चेहरा बदलणारे हे चार ऐतिहासिक निर्णय

या चुका केल्यास उत्तरपत्रिका ठरेल 'अवैध'

आयोगाने शिस्तीबाबतही कडक नियम जारी केले आहेत. खालील परिस्थितीत उमेदवाराची उत्तरपत्रिका तपासली जाणार नाही:
– उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी नसल्यास.
– काळ्या बॉल पॉइंट पेनव्यतिरिक्त इतर कोणत्याही पेनचा वापर केल्यास.
– उत्तरपत्रिकेवर विनाकारण मजकूर, चिन्हे किंवा अनावश्यक माहिती लिहिल्यास.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number