गोंदिया: राजकीय वर्तुळातून नवीन बातमी समोर येत आहे. बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता इंद्रनील नाईक गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे पार पडलेल्या बैठकीत ही घोषणा केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे शिबिर नागपूर येथे पार पडले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येतात अशी टीका केली होती. त्यानंतर आता या फेरबदलांची चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; बांबू उद्योग धोरण जाहीर, रोजगार आणि शैक्षणिक विकासासाठी 500 कोटींची तरतूद
बाबासाहेब पाटील यांनी मंगळवारी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्रीपदाचाा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात, परंतु बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे.