Bacchu Kadu Vidhan Parishad : बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी, ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे.

Bacchu Kadu Vidhan Parishad : बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी, ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. याच संदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी अखेर महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. बच्चू कडू सकाळी दहा वाजता नंदनवनवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- Baramati By Elections Exit Polls: बारामतीची सत्ता कोणाच्या हाती? पोटनिवडणुकीच्या एक्झिट पोलने राजकीय वर्तुळात खळबळ

तसेच नंदनवनवर जाऊन एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी बच्चू कडू ‘प्रहार’ पक्ष शिवसेनेत विलीन करणार असून ‘प्रहार’ सामाजिक संघटना कायम राहणार अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेश झाल्यानंतर बच्चू कडू आज शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान परिषदेसाठी दोन जागा असून त्यातील एक जागा बच्चू कडू यांचा पक्ष प्रवेश करून त्यांना देणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुढील 6 महिन्यात बच्चू कडूंना शिवसेनेकडून मंत्रिपद देखील देणार असल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात बैठक पार पडली असून शिवसेनेत बच्चू कडूंना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची ही माहिती आहे. तर दुसरीकडे उमेदवारी हवी असल्यास शिवसेनेत पक्ष प्रवेश करावा लागणार अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे पक्ष विलीनिकरणासंदर्भात अंतीम फेरीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number