Kolhapur News : ‘प्रचारात महापुरुष, संतांचे फोटो वापरण्यावर बंदी आणा’; हिंदू जनसंघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय गटांकडून प्रचार पॅम्प्लेट, बॅनर, फलक, पत्रकांवर महापुरुष, संत, आदर्श व्यक्ती व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा छापल्या जातात.

Kolhapur News : ‘प्रचारात महापुरुष, संतांचे फोटो वापरण्यावर बंदी आणा’; हिंदू जनसंघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

अमर पाटील, प्रतिनिधी

कोल्हापूर : निवडणूक प्रचारादरम्यान विविध राजकीय गटांकडून प्रचार पॅम्प्लेट, बॅनर, फलक, पत्रकांवर महापुरुष, संत, आदर्श व्यक्ती व राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमा छापल्या जातात. हे साहित्य नंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, कचरा ढिगाऱ्यात, नाल्यात, डबक्यात फेकले जाते. हा प्रकार अपमानास्पद असून, अनेकदा गंभीर सामाजिक तणावाला कारण ठरली आहे. त्यामुळे या साहित्यांवर प्रतिमा वापरण्यावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनसंघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली.

हेही वाचा : Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?

कोणत्याही व्यक्तीने किंवा पक्षाने असे साहित्य छापून वाटले, तर प्रकाशक, उमेदवार यांच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा. छपाई करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे जमा करावी. महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान केल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव  यांच्याकडे केली आहे. यावेळी आनंद पवळ, कविराज कबुरे, महेश पोवार, स्वप्निल पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number