Mumbai Bandra Court Bomb Threat: वांद्रे आणि नागपूर न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; शोधकार्य सुरू

वांद्रे आणि नागपूर न्यायालयांना ई-मेलद्वारे बॉम्ब धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

Mumbai Bandra Court Bomb Threat:  वांद्रे आणि नागपूर न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; शोधकार्य सुरू

मुंबईतील वांद्रे (Bandra) न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने गुरुवारी एकच खळबळ उडाली. न्यायालय प्रशासनाला धमकीचा ई-मेल (Threat Email) प्राप्त होताच तातडीने मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर बॉम्ब निरोधक पथक (Bomb Disposal Squad), स्थानिक पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
 
सुरक्षेच्या दृष्टीने वांद्रे न्यायालय परिसर आणि आजूबाजूच्या भागात कसून तपासणी करण्यात आली. न्यायालयात उपस्थित असलेल्या नागरिकांना सतर्क करण्यात आले असून तपासणीदरम्यान कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या. काही तास चाललेल्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळून आले नाही.

दरम्यान, पोलिसांनी धमकीचा ई-मेल नेमका कुठून पाठवण्यात आला, कोणी पाठवला आणि त्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू केला आहे. यासाठी सायबर सेल (Cyber Cell) च्या मदतीने ई-मेलचा स्रोत, आयपी अ‍ॅड्रेस (IP Address) आणि तांत्रिक माहिती तपासली जात आहे.

हेही वाचा: BJP President Nitin Nabin : भाजपाने कायस्थ व्यक्ती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून का निवडली?
 
अशाच प्रकारची आणखी एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. मुंबईहून पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये आयएसआय (ISI) चा उल्लेख करण्यात आला असून दुपारी दोनच्या सुमारास बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.

या धमकीनंतर नागपूर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात तातडीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. बॉम्ब निरोधक पथकाकडून संपूर्ण न्यायालय परिसराची झाडाझडती घेण्यात आली. सुदैवाने येथेही कोणतेही स्फोटक आढळून आले नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
 
महत्वाची बाब म्हणजे, देशभरात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या खोट्या बॉम्ब धमक्यांचे (Hoax Threats) प्रमाण वाढले आहे. मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांतील शाळा आणि न्यायालयांना यापूर्वीही अशा धमक्या मिळाल्या होत्या. बहुतांश प्रकरणांत तपासणीनंतर धमक्या खोट्या ठरल्या असल्या तरी, प्रत्येक वेळी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहून मोठी यंत्रणा तैनात करावी लागत आहे. त्यामुळे अशा धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Donald Trump: 'टॅरिफ माझा आवडता विषय, 10 महिन्यांत, मी…'; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा मोठा दावा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number