Monday, May 11, 2026 11:04:22 AM

Baramati-Rahuri Bypoll Election Result :सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीत 2,18,930 रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय; तर राहुरीमधून अक्षय कर्डिले विजयी

बारामती-राहुरी पोटनिवडणूक निकाल

baramati-rahuri bypoll election result सुनेत्रा पवार यांचा बारामती पोटनिवडणुकीत  218930 रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय तर राहुरीमधून अक्षय कर्डिले विजयी

3.35 PM 

भाजप कार्यालयाबाहेर झालमुडी वाटत जल्लोष सुरु. मंत्री मंगलप्रभात लोढा यांकडून झालमुडी वाटून आनंद साजरा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगाल निवडणूक प्रचारात केला होता उल्लेख. विरोधकांनी याच मुद्द्यावर उडवली होती खिल्ली. झालमुडी वाटून विरोधकांना मंत्री लोढांचे प्रत्युत्तर.

2.45 PM

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी दमदार कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे. तब्बल एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात केली असून या निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 

2.30 PM 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झाला आहे. बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांना 2,18,930 मतांनी विजयी केलं आहे. 

1.48 PM

पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालं. यावर मुंबई महानगरपालिकेत भाजप कार्यालयात नगरसेवकांकडून जल्लोष आणि घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये भाजपने मारलेली मुसंडी ही पक्षात आनंदाचे वातावरण निर्माण करणारी कामगिरी. मुंबई महापालिकेतील नगरसेवक भाजप कार्यालयात उपस्थित.

1.47 PM

rahuri bypolls election results:

२२ व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले ८६ हजार २५३ मतांनी आघाडीवर
२२ व्या फेरी अंती १ लाख ५० हजार ९४९ मतांची मोजणी....
मतमोजणीतील शेवटच्या पाच फेऱ्या शिल्लक....

बारामती विधानसभा पोट निवडणूक मतमोजणी..
19 फेरी  सुनेत्रा पवार यांना 168555 मताची भरघोस आघाडी..

सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचे 2024 चे मतदानाचे रेकॉर्ड मोडलं..

12.38 PM

 सतराव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले ६९,९९७  मतांनी आघाडीवर

12.34 PM 

मतमोजणीला सुरूवात, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर


बारामती विधानसभा पोटनिवडणूक 
सोळावी फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले ६४८५६  मतांनी आघाडीवर

राहुरी विधानसभेच्या पोट निवडणुकीत अक्षय कर्डीले यांची विजयकडे आगेकूच....
सोळाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले ६५ हजार ९५६ मतांची आघाडी....
मतदान केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष....
स्व. शिवाजीराव कर्डीले आणि अक्षय कर्डीले यांचे फोटो हाती घेत कार्यकर्त्यांचा जल्लोष...

12.24 PM 

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..

13 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 1लाख 12 हजार 268 मतांची आघाडी...

12.12 PM

rahuri bypolls election results: 12 व्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 50 हजार 273 मतांनी आघाडीवर

11.53 AM

सुनेत्रा पवार यांनी ओलांडला १ लाख मतांचा टप्पा
बारामती -

सुनेत्रा पवार यांनी ओलांडला १ लाख मतांचा टप्पा

बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना १ लाख ३ हजार ७०९ मतांची आघाडी

बाराव्या फेरीत सुनेत्रा पवार यांना ८०५७ मतं

बाराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित
 

11.38 AM

Baramati bypolls election results: अकराव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार यांना ९५ हजार ६५२ मतांची आघाडी
 

11.21 AM 

Rahuri Election Update....

दहाव्या फेरी अखेर मिळालेली मते

अक्षय कर्डीले (भाजप ) - 49956
गोविंद मोकाटे ( राष्ट्रवादी श.प.) - 8469
संतोष चोळके ( वंचित आघाडी ) - 3707
रावसाहेब खेवरे (अपक्ष ) - 4516

दहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 41487 मतांनी आघाडीवर.

11.20 AM 

बारामती निवडणूक मतमोजणी..

१० व्या फेरी अखेर 
एकूण झालेले मतदन - ९४७७
सुनेत्रा पवार यांना
झालेले मतदान - ९२०० इतर मते - २७७

१० व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - ८७७२८

इतरांना गेलेली एकूण मते - १७०२

11.14 AM 

Rahuri bypolls election results: आठव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 33 हजार 222 मतांनी आघाडीवर

10.43 AM

बारामती पोट निवडणूक मतमोजणी

8 व्या फेरी अखेर 

एकूण झालेले मतदन - 8831 सुनेत्रा पवारांना झालेले मतदान - 8725
इतर मते - 106

8 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना झालेले एकूण मतदान - 70642

इतरांना गेलेली एकूण मते - 1289

10.29 AM

Rahuri Election Update....

सहाव्या फेरी अखेर मिळालेली मते

अक्षय कर्डीले (भाजप ) - 29903
गोविंद मोकाटे ( राष्ट्रवादी श.प.) - 4417
संतोष चोळके ( वंचित आघाडी ) - 2178
रावसाहेब खेवरे (अपक्ष ) - 2042

सहाव्या फेरी अंती एकूण 39812 मतांची मतमोजणी

सहाव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 25286 मतांनी आघाडीवर..

10.21 AM

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..

5 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना 
एकूण झालेले मतदन - ४५६९०
इतर मते - ८९४

सहाव्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान - ५४५०४

इतरांना गेलेली एकूण मते - १०२६

10.13 AM

Rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 21 हजार 886मतांची आघाडी. अद्याप 22 फेऱ्यांची मतमोजणी बाकी.
अंतिम निकालाआधीच राहुरी शहरात झळकले अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर, कार्यकर्त्यांकडून कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर...

10.09 AM

बारामती पोटनिवडणूक मतमोजणी..

6 व्या फेरी अखेर 
एकूण झालेले मतदन - ८८१४
सुनेत्रा पवार  यांना
झालेले मतदान - ८६८२
इतर मते - १३२

पाचव्या फेरी अखेर वहिनींना झालेले एकूण मतदान - ५४५०४

इतरांना गेलेली एकूण मते - १०२६

10.02 AM 

rahuri bypolls election results : पाचव्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डिले 21 हजार 886 मतांनी आघाडीवर...

10.01 AM

Baramati bypolls election results : बारामतीमध्ये पाचव्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 45हजार 10 मतांनी आघाडीवर

9.47 AM 

Baramati rahuri bypolls election results : चौथ्या फेरीनंतर सुनेत्रा पवार 36 हजार 591 मतांनी आघाडीवर

9.42 AM

rahuri bypolls election results : 
चौथ्या फेरी अखेर भाजपच्या अक्षय कर्डिले यांना 18 हजार 123 मतांची आघाडी

9.39 AM

rahuri bypolls election results : तिसऱ्या फेरी अखेर अक्षय कर्डीलेंची 14711 मतांनी आघाडी

तिसऱ्या फेरी अखेर मिळालेली मते

भाजप अक्षय कर्डिले - 16852

राष्ट्रवादी SP गोविंद मोकाटे- 2141

वंचित संतोष चोळके- 1022

अपक्ष रावसाहेब खेवरे- 784

तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे अक्षय कर्डीले 14711 मतांनी आघाडीवर

9.30 AM

rahuri bypolls election results : अक्षय कर्डिले ९,६३७ मताधिक्क्याने आघाडीवर

9.29 AM 

Baramati bypolls election results : सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, तब्बल 26 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी

9.28 AM

पहिल्या फेरीनंती भाजपाचे अक्षय कर्डिले 4266 मतांनी आघाडीवर...

एकूण मते - 6379

अक्षय कर्डिले _4988

गोविंग मोकाटे ( राष्ट्रवादी ) - 722

संतोष चोळके वंचित - 356
 

9.20 am 

बारामती विधानसभा पोटनिवडणूक:

दुसऱ्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 16543 मतांनी आघाडीवर..
8.30 AM

पहिल्या फेरी अखेर सुनेत्रा पवार 6500 मतांनी आघाडीवर

बारामती विधानसभा पोटनिवडणूक

पोस्टल मतदानामध्ये सुनेत्रा पवार यांची आघाडी

235 मतांनी सुनेत्रा पवार आघाडीवर

राहुरी पोटनिवडणूक 

अहिल्यानगर – राहुरी पोट निवडणूक पोस्टल मतदान मतमोजणी सुरू…

भाजपा उमेदवार अक्षय कर्डिले यांनी घेतली आघाडी

शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे पिछाडीवर


 


सम्बन्धित सामग्री