नवरात्रीची सुरुवात होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी मोठी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील बाजारपेठेत आवक मंदावल्यामुळे कडधान्यांचे भाव कडाडले आहेत. यात मूग, उडीद, तूर, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कापूस यांचा समावेश असून मोठी दरवाढ होण्याचे व्यापारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
यापूर्वी साखर, कांदा यांची दरवाढ होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यापाठोपाठ कडधान्य महागल्यामुळे गृहिणी चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दुष्काळ हे प्राथमिक कारण असून त्यामुळे पिकांचे उत्पादन कमी आल्याची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाली आहे. तसेच 10% उत्पादन होणार असून तूर, मूग उडीद यांची भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. याबरोबरच इतर घटकांमुळे देखील ही दरवाढ झाली असून, ती कारणे जाणून घेऊयात..
दुष्काळाचे सावट-
यावर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरल्यामुळे पिकांचे उत्पादन अतिशय कमी होणार असल्याचे सांगितले जात आहेत. परिणामी आता मूग उडीद सोयाबीन व तूर यासारख्या पिकांचे दर दुप्पट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बाजारपेठेत आवक कमी-
बीडच्या बाजारपेठेमध्ये गतवर्षी मूग उडीद सोयाबीनची शेकडो क्विंटल आवक होत होती. मात्र आता ती आवक काही क्विंटल मध्ये होत असल्याने हे दर वाढले आहेत.
हेही वाचा – ‘Rockstar!’; न्यूयॉर्क टाईम्सच्या फ्रंटपेजवर स्थान, तुकाराम मुंढेंचा जगभरात डंका
तूर काढणीचा हंगाम बाकी असला तरी दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या शेतातील तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे यंदा बाजारात तुरीचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून तुरीचे दर वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.
कडधान्यांच्या या दरवाढीमुळे नागरिक चिंतेत असून ऐन सणासुदीला सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.