राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्याचा पैशांच्या गड्ड्यांसह एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला असून, एका व्हिडिओचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला आहे. “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
याचपार्श्वभूमिवर शिंदेंच्या शिवसेनेतील नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेच्याच आमदार, मंत्र्यांचे व्हिडीओ का बाहेर येतायत? याच उत्तर दिलं आहे. यावेळी भरत गोगावले म्हणाले की, “त्यांनी चेहरा दाखवावा आणि त्यांच्या राजीनामा घ्यावा. आता विरोधकांकडे हत्यार काय आहे? शिवसेनेतील मंत्र्यांचे व्हिडिओ का बाहेर येतायत ते शोधाव लागेल. त्यामुळे आम्ही ते सांगु शकत नाही. या गोष्टीचा आमच्या कामाशी काय संबंध नाही आहे. याप्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कानावर माहिती देऊन त्याची खात्रीशीर चौकशी करु. हे प्रेशर टेक्निक ले जातय शिवसेनेवर. जे काही अदृश्य दृश्य शक्ती आहे त्याला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही. आमच्या आमदारांनी सांगितलं आहे त्यांनी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्यावा. जर आम्हाला नाहक कोण बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन नाही करणार.”