Thursday, November 13, 2025 07:14:39 AM

Pune Bhide Bridge Open : पुणेकरांना दिलासा! 11 ऑक्टोबरला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला; वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने पुण्यातील बाजारपेठा सध्या सजलेल्या दिसत आहेत. त्यामुळे, शहरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.

pune bhide bridge open  पुणेकरांना दिलासा 11 ऑक्टोबरला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे: दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने पुण्यातील बाजारपेठा सध्या सजलेल्या दिसत आहेत. त्यामुळे, शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजार परिसरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या वाढत्या गर्दीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न पडला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे वाहतूक नियंत्रण शाखेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते रात्री 10  वाजेपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Mumbai Metro 3 Phase: मेट्रो 3 आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु; काय आहेत तिकीटाचे दर? जाणून घ्या 

नेमकं प्रकरण काय?

सध्या डेक्कन मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी केबल ब्रिजचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे, विश्रामबाग, टिळक रोड, जंगली महाराज रोड आणि लक्ष्मी रोड सारख्या प्रमुख रस्त्यांवर गर्दी वाढत होती. विशेषत: सायंकाळी जेव्हा नागरिक खरेदीसाठी याठिकाणी येत होते. 

त्यामुळे, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक नियंत्रण शाखेने खबरदारीचा उपाय म्हणून 11 ऑक्टोबर रोजी भिडे पूल काही वेळासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे, काही पुण्यातील काही मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी कमी होईल, अशी शक्यता वतर्वली जात आहे. मात्र, 11 ऑक्टोबर रोजी रात्री 10 नंतर भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. वाहतूक पोलिसांनी विश्रामबाग आणि डेक्कन वाहतूक विभागांना याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहील.


सम्बन्धित सामग्री