MPSC Paper Leak Case: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार ऋतुजा पाटील नंदुरबारमधून अटकेत

नंदुरबारमधील ज्ञानदीप सोसायटीतील तिच्या राहत्या घरातून आज सकाळी ही धडक कारवाई करण्यात आली.

MPSC Paper Leak Case: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार ऋतुजा पाटील नंदुरबारमधून अटकेत

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणाला आता अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आणि मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार येथून ताब्यात घेतले आहे. नंदुरबारमधील ज्ञानदीप सोसायटीतील तिच्या राहत्या घरातून आज सकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तिच्या निवासस्थानाची कसून झाडाझडती घेतल्यानंतर ही अटक केली. आता ऋतुजा हिला मुंबईत आणले जात असून, तिच्या चौकशीतून या रॅकेटमधील आणखी काही मोठे चेहरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रेमप्रकरणातील वादातून फुटले भांडे 

या हायप्रोफाइल पेपरफुटीमागे अत्यंत नाट्यमय घटनाक्रम असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांनी प्रवीण पाटील नावाच्या मध्यस्थाच्या मदतीने हा गोपनीय पेपर मिळवला होता. ऋतुजाने हा फुटलेला पेपर तिच्यासोबत प्रेमात असलेल्या गौरव पाटील या तरुणाला अभ्यासासाठी दिला होता. मात्र, काही काळानंतर या दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये कटुता आली आणि त्यांचे ब्रेकअप झाले. या वादानंतर चिडलेल्या गौरव पाटील याने थेट एमपीएससी प्रशासनाकडे या पेपरफुटीची लेखी तक्रार केली आणि संपूर्ण गैरप्रकार उघडकीस आला.

हेही वाचा – Baramati Crime : "तुम्हाला आमचा हिसका दाखवतो" पोटच्या पोरांकडून आई-वडीलांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण; धक्कादायक कारण समोर

आयोगाच्या अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या 

एमपीएससीच्या या परीक्षेचा पेपर फोडल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई करत अनेक उच्चपदस्थांना गजाआड केले आहे. यामध्ये आयोगाचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांच्यासह सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, विश्वेश्वर नकाते आणि मुख्य सूत्रधार मुलीचे वडील अमृत पाटील यांचा समावेश आहे. आता मुख्य लाभार्थी आणि आरोपी ऋतुजा पाटील पोलिसांच्या हाती लागल्याने, तिने हा पेपर नक्की कोणाकोणाला दिला, किती रुपयांचा व्यवहार झाला आणि या नेटवर्कमध्ये आयोगातील आणखी किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होता, याचा उलगडा होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number