रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 2 मोठे निर्णय लागू

Auto Fare : रिक्षांसाठी डिजिटल मीटर सक्तीचा करण्यात आला आहे. पहिल्या दीड किमीला 30 रुपये, नंतर प्रति किमी 20 रुपये दर असेल. 30 दिवसांत मीटर बसवणे बंधनकारक असून, ओला, उबरबाबतही मोठा निर्णय घेतला आहे.

रिक्षाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 2 मोठे निर्णय लागू
2 Big Decisions for Auto Passengers in solapur

सोलापूर : सोलापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरातील बेशिस्त रिक्षा भाडे आकारणीला आळा लागण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.

जाणून घ्या सविस्तर
नव्याने रिक्षा खरेदी करणाऱ्यांना डिजिटल मीटरसहत रिक्षा घ्यावी लागणार आहे. तर जुन्या रिक्षाचालकांना पुढील 30 दिवसांच्या आतच आपल्या रिक्षामध्ये डिजिल मीटर बसवणे हे बंधनकारक राहणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची होत असलेली लूट आता थांबणार आहे. त्यासह प्रशासनाने रिक्षाच्या भाडेदरातही वाढ करण्यात आलेली आहे.

असे असतील नवे दर
नव्या दरानुसार,पहिल्या दीड किलोमीटरसाठी प्रवाशांना 30 रुपये मोजावे लागतील, त्यानंतर पाहिलं तर प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपये दर आकारला जाणार आहे.

आणखी एक मोठा निर्णय
नव्या निर्णयामुळे, मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे लागणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे प्रवाशांच्या सोयीसाठी अजून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोलापूर शहरात आता आलो, उबर तसेच रॅपिडोसारख्या कॅब एग्रीगेटर सेवांना अधिकृत परवानगी ही देण्यात येणार आहे. यासंबंधित कंपन्यांनी प्रशासनाकडे अर्ज केले असून, सध्या त्या अर्जांची पडताळणी करत लवकरच अधिकृत परवानगी दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number