Sunday, June 15, 2025 10:46:36 AM

मोठी बातमी! ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघांच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू

मंगळवारी वेगवेगळ्या वाघांच्या हल्ल्यात एक पुरूष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

मोठी बातमी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघांच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू
Tiger
Edited Image

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी वेगवेगळ्या वाघांच्या हल्ल्यात एक पुरूष आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे निवासस्थान असलेल्या या जिल्ह्यात या महिन्यात वाघांच्या हल्ल्यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मूल तहसीलमधील चिरोली गावातील नंदा संजय मकलवार (45) ही महिला तिच्या पती आणि इतरांसह बांबूच्या काड्या गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती. परंतु, सकाळी चिचपल्ली वनपरिक्षेत्रात वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. 

हेही वाचा - आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात 17 लोकांचा बळी

दरम्यान, कांतापेठ येथील सुरेश सोपानकर (52) यांच्यावर दुपारी चिचपल्ली परिक्षेत्रातील वाघाने हल्ला केला. सोपानकर गुरे चारण्यासाठी जंगलात गेले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, 10 मे रोजी सिंदेवाही तहसीलमधील तीन महिला तेंदूपत्ता गोळा करत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला होता. याशिवाय, परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या इतरही घटना घडल्या आहेत.

हेही वाचा - माकडा माकडा हुप.. वाघाला बसवलं चूप! पाहा माकडाची शिकार करायला गेलेल्या वाघाची फजिती, पाहा VIDEO

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू - 

तथापि, 17 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (टीएटीआर) बफर झोनमध्ये वाघांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. पहाटेच्या वेळी गावकरी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेले असताना वाघांने हल्ला केला. वन कर्मचाऱ्यांनी वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीला सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. 


सम्बन्धित सामग्री