Raj Thackeray Eknath Shinde : आताची मोठी बातमी, राज ठाकरे नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली.

Raj Thackeray Eknath Shinde : आताची मोठी बातमी, राज ठाकरे नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

राज्यात नुकत्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर या दोघांची ही पहिलीच भेट होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली असून  चर्चेचा मुख्य विषय आगामी राजकीय समीकरणे असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे आज सकाळीच भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील आपल्या चिरंजीवांच्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण राज ठाकरे यांना देण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद साधल्याने महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number