Pune Ganesh Visarjan : मोठी बातमी! पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान आग; घटनेमुळे भाविकांची धावपळ

Pune Shocking Video : पुण्यातून सध्या अतिशय धक्कादायक बातमी समोर आलेली आहे.गणपती विसर्जनादरम्यान आग लागल्याची घटना घडलेली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र,सध्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे.
Fire Breaks Out During Ganpati Visarjan
गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत अचानक भडका

पुणे : महाराष्ट्रासह सर्वत्र सध्या गणपती विसर्जनाची धामधूम सुरु आहे. कालपासून गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली असून, मुंबई आणि पुण्यासह विविध शहरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान केलेल्या आतिषबाजीचा थरार एक मंडळाला चांगलाच महागात पडला आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध गणेश मंडळाच्या देखावल्याला आतिषबाजी करत असताना अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हेही वाचा-ST Bus Ticket Booking : ST बसचं तिकीट काढणं झालं झटपट; ‘हा’ नंबर आजच मोबाईलमध्ये सेव्ह करा

मिरवणुकीत फटाके फोडत असताना अचानक ठिणगी उडून ती थेट आकर्षक असलेल्या देखाव्यावर पडली आणि क्षणात आगीन काहीसे रौद्र रुप धारण केले. ही घटना घडताच कार्यकर्त्यांमध्ये आणि भाविकांमध्ये काहीसा गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेती कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. काही वेळात आग विझवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून मंडळांना आतषबाजी टाळण्याचे आवाहन केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version