Monday, March 09, 2026 08:17:59 AM

Solapur Political Crisis : सोलापुरात मोठा राजकीय भूकंप, शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार शिवसेनेच्या संपर्कात?

सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे महत्त्वाचे शिलेदार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

solapur political crisis  सोलापुरात मोठा राजकीय भूकंप शरद पवार गटाचे खासदार आणि आमदार शिवसेनेच्या संपर्कात

Solapur Political Crisis : महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे महत्त्वाचे शिलेदार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या सत्ताधारी नेत्यांसोबतच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट  
माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मतदारसंघातील विकासकामांच्या संदर्भात असल्याचे सांगण्यात येत असले तरी, राजकीय जाणकारांच्या मते याचे अर्थ वेगळे असू शकतात. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून विजय मिळवल्यानंतर मोहिते पाटील यांची सत्ताधारी गटाशी वाढलेली जवळीक अनेक प्रश्नांना जन्म देत आहे.

आमदार उत्तम जानकर आणि उदय सामंत यांची भेट
दुसरीकडे, शरद पवार गटाचे आक्रमक आमदार उत्तम जानकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उत्तम जानकर हे जिल्ह्यातील प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी अचानक शिवसेनेच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याने ते शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा आता कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा - Ajit Pawar Plane Crash: 'अजितदादांच्या विमानाचा स्फोट करण्यासाठी पायलटने ते मुद्दाम...'; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

पक्षांतराच्या चर्चा आणि राजकीय समीकरणे
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाचे काही आमदार आणि खासदार भाजपच्याही संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पकड मजबूत करण्यासाठी महायुतीकडून या नेत्यांना साद घातली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या भेटींचे रूपांतर पक्षांतरात झाले, तर सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसू शकतो.

नेत्यांकडून 'विकासा'चा दावा
या संदर्भात संबंधित नेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी या भेटी निव्वळ मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांसाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या आणि राजकीय समीकरणांच्या काळात होणाऱ्या या भेटींमुळे काहीतरी शिजतयं अशी भावना राजकीय वर्तुळात निर्माण आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या