मुंबई : जर तुम्हीही ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक कडक नियम लागू केलेले आहे. आता जर प्रवास करताना फक्त तिकीट असून चालणार नाही, तर प्रवाशांना त्यासोबत मूळ ओळखपत्रक जवळ ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर हे नसेल तर मोठा दंड भरावा लागू शकतो.
रेल्वेचा हा नियम माहित असायलाच हवा
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 या एका महिन्याच्या कालावधीमध्ये विशेष तिकीट तपासणी केली जाणार आहे. या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश हा रेल्वेच्या आरक्षण सुविधांचा होत असलेला गैरवापर थांबवणे हा आहे. या विशेष मोहिमेत प्रत्येक स्थानंकावर आणि धावत्या रेल्वेत तिकीट तपासणी पथकाकडून सखोल तपासणी केली जाईल.
हेही वाचा-फोनचा वापर आपण करायचा, फोनने आपला वापर नाही! Digital Detox म्हणजे नेमकं काय?
विशेष म्हणजे सवलतीच्या दरात असलेली तिकीटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि अनेक प्रकारचे पासेसवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर या मोहिमेत लक्ष ठेवले जाईल. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या प्रकारच्या सवलतीतमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी त्यांची पात्रता ही सिद्ध करण्यासाठी मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. जर एकाच PNR वर अनेक प्रवाशांचे आरक्षम असेल, तर त्या PNR मधील किमान एका प्रवाशाकडे मूळ ओळखपत्र असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तपासणी दरम्यान प्रवाशांकडे मूळ ओळखपत्र नसेल, तर त्या पीएनआरवरील सर्व प्रवाशांना विना तिकीट प्रवासी म्हणून गणण्यात येईल आणि नियमानुसार दंडात्मक कारवाई ही केला जाईल. शिवाय ई-पास आणि पीटीओवर प्रवास करणाऱ्यांनी प्रवास सुरु करण्याआधी त्या पासच्या बदल्यात अधिकृत तिकीट घेतले आहे का, याची करणे आवश्यक आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून प्रवासाला निघण्यापूर्वी आपले आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर सरकारी ओळखपत्र सोबत आहे की नाही, हे नक्की तपासा.