Friday, July 11, 2025 11:30:46 PM

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; बलात्कार करणारा पीडितेचा जुना मित्र

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट बलात्कार करणारा पीडितेचा जुना मित्र

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची 10 पथकं शोध घेत होती. अखेर, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. कोंढव्यातील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा फिर्याद नोंदवणाऱ्या मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपी हा पीडित तरुणीचा जुना मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही तक्रार मुलीने दाखल केली होती, तिने खोटी माहिती दिली होती आणि डिलिव्हरी बॉय अनोळखी असल्याचे सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर, हे दोघे एकमेकांना ओळखत असल्याचे समोर आले आहे. गेल्या एका वर्षापासून या दोघांची ओळख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील शारीरिक संबंध सहमतीने झाले होते. माहितीनुसार, जो ओळखीचा तरुण होता तो फ्लॅटवर आला. त्याने काही सेल्फी काढल्या आणि तो तिथून निघून गेला. 

हेही वाचा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा

एकीकडे, पोलिसांनी माहिती दिली की, 'सेल्फी फोटोंमध्येही छेडछाड करण्यात आली आहे'. तर दुसरीकडे, तरुणीनं माझी मानसिक स्थिती बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि सुमारे पाचशे सीसीटीव्ही तपासले आहेत. क्राईम ब्रँच आणि स्थानिक पोलिसांनी तपास केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यादरम्यान, 'अतिप्रसंग झाला का नाही?', याचा तपास पोलीस करत आहेत. 'त्यानंतरच अधिक माहिती जाहीर केली जाईल', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, तक्रार दाखल करण्याची पद्धत चुकीची आहे. दोघे एकमेकांना ओळखतात आणि बऱ्याच वेळा तो तरुण बाणेरहून तरुणीच्या घरी पिझ्झा आणि बर्गर पाठवत होता. घटनेच्या दिवशी सकाळी 5:30 वाजता दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संभाषण झाले आणि ही घटना संध्याकाळी 7 वाजता घडली. रात्री 8:30 वाजता मुलगा तेथून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

पीडितेची गुरुवारी ससून रुग्णालयात मानसिक तपासणी आणि सल्लामसलत करण्यात आली आहे. तिचे नातेवाईक आल्यानंतर पुढील तपास केला जाईल. 'त्यानंतरच बलात्कार झाला का नाही? याचा तपास होईल', अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 'या सगळ्यात काय कारवाई करावी? याच्या कायदेशीर बाबीही पोलीस तपासत आहेत आणि पुढील चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल', असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.


सम्बन्धित सामग्री