Wednesday, June 25, 2025 02:10:17 AM

अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर

उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात नवनवीन माहिती समोर येत आहे.आता अमोलने पहिली गोळी झाडली असा जबाब प्रत्यक्षदर्शीने नोंदवला आहे.

अमोल खोतकर एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट समोर

छत्रपती संभाजीनगर: उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात नवनवीन माहिती समोर येत आहे.आता अमोलने पहिली गोळी झाडली असा जबाब प्रत्यक्षदर्शीने नोंदवला आहे. लड्डांच्या घरीवरील दरोडा प्रकरणात मुख्य सूत्रधार अमोल खोतकर यांचा पोलिसांकडून एन्काउंटर झाला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये एन्काउंटरनंतर कलम 164 अंतर्गत एन्काउंटरमधील महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले. त्या जबाबात बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोड्याचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकरच्या मैत्रीणने अमोलनेच पहिली गोळी झाडल्याचा जबाब दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तिचा हा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा असणार आहे. खुशीसह अमोलच्या जवळच्या एका व्यक्तीच्या चौकशीवर आता लुटलेल्या सोन्याच्या तपासाची मदार अवलंबून आहे. म्हणून पोलिसांनी खुशीचा ताबा मिळण्यासाठी सीआयडीला पत्र पाठवल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार मिळणार

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा पडल्याची घटना घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी अमोल खोतकर एन्काउंटरमध्ये मारला गेला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणे आणखीनच अवघड बनले. त्यानंतर खोतकरचा एन्काउंटर कसा झाला याचाही तपास केला जात आहे. खोतकर याच्या कुटुंबाने त्याच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच पकडून धरले आहे. मात्र आता अमोलच्या मैत्रिणीने दिलेला जबाब महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अमोलनेच पहिली गोळी झाडली असे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या खुशीने सांगितले आहे. त्यामुळे आता या केसला वेगळे वळण मिळणार आहे. शुक्रवारी लड्डाच्या घरावरील दरोड्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. 

नेमकं प्रकरण काय? 
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी मोठा दरोडा पडला होता. या दरोड्यातील एका संशयित आरोपीचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. अमोल खोतकर असं त्याचं नाव आहे. या दरोड्यात साडेपाच किलोचे सोने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  दरोड्याच्या घटनेतील मुख्य आरोपी अमोल खोतकर याने गोळीबाराचा प्रयत्न केला. उत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला त्यात खोतकरचा एन्काउंटर झाला असे पोलिसांकडून सांगण्यात आले. अमोल खोतकर गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये रात्री खोतकर कार घेऊन आला. त्यावेळी समोरच त्याने पोलिसांना पाहिले. त्यानंतर खोतकरने गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अमोल खोतकरचा एन्काउंटर झाला असे पोलिसांनी सांगितले. मात्र खोतकर कुटुंबियांनी अमोलचा मृत्यू झाला लावून धरला आहे. याच प्रकरणात अमोलनेच पहिली गोळी झाडली असे त्याची मैत्रीण खुशी हिने न्यायालयात सांगितले. त्यामुळे आता तिच्याकडून चोरी केलेल्या सोन्याचे गूड उलगडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


सम्बन्धित सामग्री