पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ दिवशी होणार सुरु; तिकीट दर…

Hinjewadi Shivajinagar Metro Update : पुणेकरांसाठी विशेषतहा हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांसाठी अखेर अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. अखेर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाला अखेर ग्रीन सिग्नल मिळालेला आहे.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ‘या’ दिवशी होणार सुरु; तिकीट दर…
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मुहूर्त मिळाला

पुणे : पुणेकरांसाठी विशेषतहा हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांसाठी अखेर अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाला अखेर ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. मेट्रो नेमकी कधी सुरु होणार? जाणून घ्या नवीन तारीख काय आहे.

सेवा कधी सुरू होणार?
या तब्बल 23.30 किलोमीटर लांबी असलेल्या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी अधिकृत मंजुरी देखील दिली आहे. पीएमआरीएचे आयुक्तांनी देखील आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आणि म्हणाले, मेट्रो सुरक्षेची असलेली सर्व परवानगी मिळाली आहे. आता फक्त काही किरकोळच काम राहिली आहे, जी येत्या 15 दिवसांतच पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतरच मेट्रो धावण्यासाठी सज्ज असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्यक्ष प्रवासी सेवा ही कधीपासून सुरु करणार आहेत, याचा अंतिम निर्णय हा राज्य सरकारच घेणार आहे. सरकारची मान्यता मिळताच ही सेवा सुरु करण्यात येईल.

हेही वाचा-सणासुदीत रेल्वे तिकिटाचं आरक्षण नाही? नो टेन्शन! पुणे विभागातून 216 स्पेशल ट्रेन ; कधी अन् कोणत्या मार्गावर धावणार?

सुरुवातील हा मार्ग फक्त पहिल्या टप्प्यात सुरु करण्याचा विचार होता. मात्र आता संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाजीनगरमध्ये पुणे मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी मिळाल्याने प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात ही वाढेल, असा विश्वास प्रशासनाला आहे. आता या मार्गावरील सर्व 17 स्थानकाला सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे.

तिकीट दराबाबत आली अपडेट
दरम्यान, मेट्रो सुरु झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद आणि फेऱ्यांचा आढावा घेत या मार्गावरील तिकीट दर हे निश्चित केले जातील आणि उद्घाटनाच्या दिवशीच ते जाहीर होतील.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number