Maharashtra BJP: भाजपची ‘सुपरपॉवर टीम’ तयार; ‘हे’ आहेत आगामी निवडणुकांचे स्टार प्रचारक

निवडणूक आयोगाने मर्यादा वाढवल्यानंतर पक्षाने सर्व दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले असून या लढाईत आक्रमक रणनिती स्वीकारल्याचे स्पष्ट दिसते.

Maharashtra BJP: भाजपची ‘सुपरपॉवर टीम’ तयार; ‘हे’ आहेत आगामी निवडणुकांचे स्टार प्रचारक

मुंबई: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष रणधुमाळीसाठी सज्ज होत असताना भाजपने सर्वांत आक्रमक पवित्रा घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची मर्यादा 20 वरून 40 केली आणि त्याच क्षणी भाजपने पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आपली मोठी प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षातील सर्व दिग्गजांची नावे आढळतात.

राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी मतदान 2 डिसेंबर , तर निकाल 3 डिसेंबर रोजी घोषित होणार आहेत. निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असून अनेक ठिकाणी भाजपने युतीचा पर्याय टाळून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय समीकरणे अधिकच रंजक बनली आहेत. बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून त्याच जोशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढाईत उतरायची तयारी आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अनुभवी, तडफदार आणि जनसंपर्कात पारंगत असे नेते अग्रभागी आहेत. या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात असेल. दोघेही राज्यभरात प्रचाराची दिशा ठरवणार आहेत.

हेही वाचा: Cooper Hospital Mumbai: कूपर रुग्णालयात व्यवस्थेचा बळी! उपचार मिळायला उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू

केंद्रीय पातळीवर नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, विनोद तावडे आणि शिव प्रकाश हे प्रमुख चेहरे असतील. राज्य पातळीवर चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, गणेश नाईक आणि जयकुमार रावल या नेत्यांचा प्रभावी प्रचार पाहायला मिळेल. त्यातच नारायण राणे, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, आशिष शेलार, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले आणि मेघना बोर्डीकर या नेत्यांनाही महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे.

पूर्वी केवळ 20 स्टार प्रचारकांना परवानगी होती. मात्र पक्षांच्या मागणीनुसार आयोगाने ती संख्या वाढवून 40 केली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपताच हे सर्व नेते राज्यभर प्रचाराचा धडाका उडवतील. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करणारे इद्रिस मुलतानी आणि माजी खासदार अमर साबळे यांनाही या यादीत स्थान दिले असून भाजपच्या ‘सर्वसमावेशक’ चेहऱ्यावर पक्षाने भर देण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकांमध्ये भाजपचे ‘मिशन इलेक्शन’ किती प्रभावी ठरणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यभर तापलेल्या राजकीय वातावरणात भाजपची ही 40 नेत्यांची फौज मोठा फरक घडवू शकते का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आज खात्यात जमा होणार आहेत 2000 रुपये; कसे तपासाल? स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया जाणून घ्या

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number