BJP MLA Parinay Phuke : "ट्रम्प जरी येऊन निवडणूक लढले तरी आपल्याला हरवू शकत नाही" भाजप आमदार परिणय फुकेंचा अजब दावा

भंडारा येते भाजप कडून संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी अजब दावा केलेला आहे.

BJP MLA Parinay Phuke : &quotट्रम्प जरी येऊन निवडणूक लढले तरी आपल्याला हरवू शकत नाही&quot भाजप आमदार परिणय फुकेंचा अजब दावा

भंडारा येते भाजप कडून संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून मोदीजींच्या 25 वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील विकासाची आणि जनसेवेची वाटचाल जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आज भंडारा येथे भारतीय जनता पार्टीची जिल्हा आढावा बैठक पार पडली. यावेळी उपस्थित राहून बूथस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी अजब दावा केलेला आहे. पक्षाच्या संघटनात्मक तयारीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फुके यांनी विरोधकांवर निशाणा साधत भाजपच्या ताकदीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले आहे की, जमिनीवरच्या निवडणुकीत आपल्याला कुणी हरवू शकत नाही. तर काँग्रेस आणि राहुल गांधी हे लोक चिल्लर आहेत.

हेही वाचा- BJP MLA Viral Video : कोट्यवधींचा मालक, पण रस्त्यावर भिकारी बनून फिरण्याची वेळ; भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं असं काय घडलं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जरी येथे येऊन निवडणूक लढले तरी ते आपल्या हरवू शकत नाही. असा अजब दावा परिणय फुके यांनी केल आहे. भंडारा येथील संघटनात्मक बैठकीदरम्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तसेच या बैठकीदरम्यान भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी केलेल्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्येही चर्चा रंगली असून, फुके यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात विविध प्रकारे चर्चा केली जात आहे. स्थानिक पातळीवरील भाजपची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि निवडणुकीतील पक्षाची तयारी यावर भर देताना त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र, ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख करत केलेल्या या दाव्यामुळे फुके यांचे वक्तव्य सोशल मीडिया आणि राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number