Wednesday, November 19, 2025 01:22:53 PM

BJP MLA Shivajirao Kardile Passed Away : भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन

भाजपचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

bjp mla shivajirao kardile passed away  भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन

Shivajirao Kardile News : भाजपचे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांचे आज, 17 ऑक्टोबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरेदेखील होते. 

शिवाजी कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपल्या कारकि‍र्दीला सुरवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. 2009 ला त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पुन्हा 2014 ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2009 ते 2014 असे सलग दहा वर्ष राहुरी मतदारसंघाचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत त्यांनी विजयाची हॅट्रीक रोखली होती. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. त्यांच्या निधनावर आमदार रोहित पवार यांची एक्स पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे. 


सम्बन्धित सामग्री