सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. भाजपच्या मंत्री व आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नाराज असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठ दिवसापासून सुरू आहे. दुसरीकडे मात्र सभागृह सुरु असताना भाजपचे मंत्री, आमदार दांडी मारत असल्याने अधिवेशन काळात राज्यातील आमदारांना लक्षवेधी मांडत असताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर प्रदेशाध्यक्ष चव्हाण नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- Sangli Miraj Panchyat Samiti: मिरजेत राजकीय 'सिनेस्टाईल' थरार, सभापती निवडीपूर्वीच शिंदे गटाच्या सदस्याचे अपहरण
विधानसभा व विधानपरिषदेत आमदार व मंत्र्यांची गैरहजेरी असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी नाराजी व्यक्त केली. भाजपचे मंत्री व आमदार दुपारनंतर गैरहजेर राहतात, त्यामुळे आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील सर्व आमदार व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार. तसेच बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे-कोकण व मुंबईतील मंत्री व आमदारांचा क्लास घेणार आहेत. विधीमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी रविंद्र चव्हाण व चंद्रशेखर बावनकुळे आमदार व मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत.