Thursday, February 12, 2026 11:41:57 PM

BMC Election 2026: मुंबई महापालिकेचा कौल मतदारराजाच्या हाती! मुंबईच्या महापालिकेसाठी 'काऊंटडाऊन' सुरू

राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, राज्यातील जनता आज मतदानाची भूमिका बजावणार आहे.

bmc election 2026 मुंबई महापालिकेचा कौल मतदारराजाच्या हाती मुंबईच्या महापालिकेसाठी काऊंटडाऊन सुरू

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. याचपार्श्वभूमिवर आज सकाळी 7 वाजल्यापासून राज्यभरात बृहन्मुंबई महानगरपालिकांसह 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. यादरम्यान राज्यभरात 15 हजार 931 उमेदवारांसह एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदारांची नोंद झाली असून, राज्यातील जनता आज मतदानाची भूमिका बजावणार आहे. यावेळी मुंबई महानगरपालिका म्हटलं की, ती ठाकरे बंधूंसाठी महत्त्वाची असलेली निवडणूक म्हणून मानली जाते.

हेही वाचा- Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज मतदानाचा महासंग्राम! 29 महापालिकांसाठी आज मतदान; उमेदवारांची संख्या थक्क करणारी

मात्र यावेळी ठाकरे बंधूंच्या समोर महायुतीचे आवाहन आहे, त्यामुळे ठाकरे बंधू आणि महायुती या दोघांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असणार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे), भाजप, काँग्रेस, मनसे राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे एकूण 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र यात भाजप आणि शिवसेना (शिंदे) विरुद्ध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील लढतीवर सर्वांचे लक्ष लागले असून मुंबई कोणाची? याचा निर्णय आजच्या मतदानावर ठरणार आहे. यावेळी राज्यातील एकूण 893 प्रभागांसाठी तब्बल 15,931 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसह पक्षानुसार भाजप आणि दोन्ही शिवसेनेसह मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा निवडणूक प्राणप्रतिष्ठेची असणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ही लढत केवळ श्रीमंत पालिकेच्या सत्तेसाठी नसून अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची ठरणार आहे. 


सम्बन्धित सामग्री