Thursday, February 19, 2026 08:35:50 AM

BMC Municipal Elections 2026 : मुंबईतील महापालिका प्रभागांमध्ये मुसलमानबहुल! राजकारणावर याचा काय परिणाम?

मुंबईत सुमारे 50 महापालिका प्रभाग मुसलमानबहुल होणे आणि त्यातील 34 मतदार संघात मुसलमान निर्णायक असणे ही बाब लक्ष देण्याजोगी आहे. हा मुंबईच्या इस्लामीकरणाचा कट तर नाही ना ?

bmc municipal elections 2026  मुंबईतील महापालिका प्रभागांमध्ये मुसलमानबहुल राजकारणावर याचा काय परिणाम

मुंबईत सुमारे 50 महापालिका प्रभाग मुसलमानबहुल होणे आणि त्यातील 34 मतदार संघात मुसलमान निर्णायक असणे ही बाब लक्ष देण्याजोगी आहे. हा मुंबईच्या इस्लामीकरणाचा कट तर नाही ना ?

प्रसाद काथे|

1.    कोणत्याही देशाचे अथवा शहराचे भवितव्य त्या देशाची लोकसंख्या ठरवते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची भवितव्य बदलण्याचा सुनियोजित प्रयत्न केला जात आहे. 

2.    मुंबईमध्ये १९६१ साली हिंदूंची लोकसंख्या ८८ टक्के होती, तर मुस्लिम लोकसंख्या अवघी ८ टक्के होती. त्यानंतर २०११ सालच्या जनगणनेनुसार हिंदूंची लोकसंख्या घटून ६७.७ झाली तर मुस्लिम लोकसंख्या २०.६ टक्क्यांनी वाढली होती. 

3.    आता मात्र २०५१ सालापर्यंत हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज असून अल्पसंख्यांकांची लोकसंख्या मात्र ३० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. परिणामी, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये हिंदू कसेबसे बहुसंख्य ठरण्याची भिती आहे.

4.    अशा प्रकारच्या बदलाचे कारण हे नैसर्गिक नक्कीच नाही. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) तर्फे मुंबईच्या विविध ६१ भागांमध्ये केलेल्या शास्त्रीय सर्वेक्षणाद्वारे मुंबईतील लोकसंख्याबदल हा नियोजनपूर्वक असल्याचे उघड झाले आहे.

5.    टिसतर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये उघड झालेली धक्कादायक बाब म्हणजे मुलाखत घेतलेल्या ७,००० हून अधिक व्यक्तींपैकी: ३,०१४ जणांची ओळख अवैध स्थलांतरित (बांगलादेशी आणि रोहिंग्या) म्हणून पटली आहे. या अभ्यासातून सुनियोजित घुसखोरी आणि त्याद्वारे लोकसंख्याबदलाची इकोसिस्टीम स्पष्ट झाली आहे. 

6.    ओळख पटलेल्या अवैध स्थलांतरितांपैकी ९६% मुस्लिम आहेत. ते  मुंबई महानगरपालिकेच्या ५६ प्रभागांमध्ये एकवटले आहेत. ज्यामुळे स्थानिक सामाजिक-राजकीय रचना प्रभावीपणे बदलली आहे. यातूनच "नो-गो झोन्स" (प्रवेश निषिद्ध क्षेत्रे) तयार झाली आहेत.

7.    बदललेल्या लोकसंख्येचा शस्त्राप्रमाणे वापर होत असल्याचेही या सर्वेक्षणातून स्पष्ट होते. कारण, 

8.    या अवैध स्थलांतरितांपैकी ७३% लोकांकडे बनावट मतदार ओळखपत्रे होती. परदेशी नागरिक केवळ भारतीय भूमीवर राहत नसून; ते भारताच्या निवडणुकांवर सक्रियपणे प्रभाव टाकत आहेत. 

9.    मुंबईत एकेकाळी अशाचप्रकारे लोकसंख्येत बदल घडवून गुन्हेगारी जगताचा उदय झाला आणि पुढे त्यातूनच इस्लामिक दहशतवादास बळ देण्यात आले होते.

10.    दाऊद इब्राहिमपासून ते मेमनपर्यंतचे असे गुन्हेगार लोकसंख्येत बदल झालेल्या भागांमध्येच फोफावले होते, हे विसरता येणार नाही.

11.    अनियंत्रित स्थलांतर संघटित गुन्हेगारीसाठी मनुष्यबळ पुरवण्याचे साधन असते. मात्र, त्याचा देशाच्या सुर सैनिक आणि लपण्याची ठिकाणे पुरवते. याचे सुरक्षेवर गंभीर परिणाम होतात आणि याचे कारण म्हणजे घुसखोरांना असलेला प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष राजकीय पाठिंबा.

12.    जगाचा इतिहास बघितल्यास कोणतेही शहर एका दिवसात कोसळत नाही. प्रथम त्याची ओळख पुसण्यास प्रारंभ होतो. मुंबईमध्येही सध्या तसेच करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई सध्या एका गंभीर लोकसंख्याशास्त्रीय धोक्याचा सामना करत आहे. 

13.    वर्ष २०५१ हे फारसे दूर नाही. मुंबईच्या मतदारयाद्यांची स्वच्छता वेळीच न झाल्यास लवकरच मुंबईचा नकाशा बदलणार, यात शंका नाही.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या