Sunday, July 13, 2025 10:28:04 AM

बुलढाण्यात रुग्णाची आर्थिक पिळवणूक; महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार असूनही मागितले 25 हजार रुपये

बुलढाण्यात महात्मा फुले योजनेत मोफत उपचार असूनही रुग्णाकडून २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड. नातेवाईकांनी तक्रार दाखल केली, चौकशी समिती गठीत होणार.

बुलढाण्यात रुग्णाची आर्थिक पिळवणूक महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार असूनही मागितले 25 हजार रुपये

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार असतानाही तब्बल 25 हजार रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार थेट मोबाईलमध्ये चित्रीत करत सोशल मीडियावर व्हायरल केला असून जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयात डॉक्टर अनुपस्थित असतानाही रुग्णाला भरती करून घेतले गेले आणि तब्येत बिघडल्यानंतर संभाजीनगरला रेफर करण्यास सांगितले गेले.

हेही वाचा: Bank Holidays in July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी; राज्यनिहाय यादी जाहीर

या गंभीर प्रकरणावर अद्याप रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकरण केंद्रीय आरोग्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जिल्ह्यात घडतेय, त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, रुग्णालयाविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती गठीत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
 


सम्बन्धित सामग्री