Buldhana: बुलढाणामध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास उघड; शाळेतील बेंच वाहतूक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

शाळेतील डेक्स बेंच वाहतूक करताना विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असून मालवाहक गाडीमध्ये डेक्स बेंचला धरून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत आहेत.

Buldhana: बुलढाणामध्ये विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास उघड; शाळेतील बेंच वाहतूक करतानाचा व्हिडिओ व्हायरल

शाळेतील डेक्स बेंच वाहतूक करताना विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मालवाहक गाडीमध्ये डेक्स बेंचला धरून विद्यार्थी जीवघेणा प्रवास करत असल्याचे दिसून येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्याच्या आसलगाव येथील शेठ तुळशीराम ढोकणे विद्यालयातील हा प्रकार आहे. ढोकणे शाळेतील विद्यार्थी मालवाहक गाडीतून आपल्या शाळेतील डेक्स बेंच गावातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये घेऊन जात होते. डेक्स बेंचने भरलेले वाहन आणि त्याला धरून उभे असलेले विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मालवाहू वाहनातून साहित्य नेण्यासाठी शाळेने शिपाई किंवा इतर मजुरांची मदत घेणे अपेक्षित असताना विद्यार्थ्यांकडून ही कामे केल्या जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number