छत्रपती संभाजीनगर: पैठण तालुक्यातील आडूळ येथे बारा दिवसांपूर्वी गजबजल्या ठिकाणी भरदिवसा घरफोडी करुन पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या चोरट्यास पाचोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्यास जेरबंद करून चोरट्याकडील सोन्या चांदीचे दागिन्याचे मुद्देमाल 2, लाख 70 हजार रुपयांचे किमतीचे जप्त करण्यात आहेत.आडूळ बुद्रूक येथील मोमीनपुरा भागात राहणारे शेतकरी शेख नजीर जमाल राहतात त्यांची पत्नी, सून व लेक घराला कुलूप लावून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्या आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी गेल्या होत्या.
हेही वाचा: 1 जुलैपासून वाहनं होणार महाग; 30 लाखांपेक्षा महाग इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर
त्यांचा मोठा मुलगा कदीर हा गावातील कापड दुकानावर कामाला तर शेख नजीर हे आडूळ येथील बसस्थानकावर होते. नेमक्या या संधीचा फायदा घेऊन दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून 1 लाख 40 हजार रुपये रोखसह सोन्याचे नेकलेस, गंठन, अंगठी,राणीहार, सोन्याची साखळी, कानातील रिंग, पैंजण असे सहा तोळ्याचे दागदागिनेसह 250 गँम वजनाचे चांदीचे असे लाखोंचे मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केले.
शेख नजीर जेंव्हा बसस्थानकावरून दुपारी जेवण करण्यासाठी घरी गेले तेंव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला.या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्याकडील सोन्या चांदीचे दागिन्याचे मुद्देमाल 2, लाख 70 हजार रुपयांचे किमतीचे जप्त करण्यात आहेत. पाचोड पोलीसांसह स्थानिक पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.