Gold Rate Today: नवरात्रीच्या पावन पर्वाला सुरुवात होत असतानाच सुवर्णखरेदी करू इच्छिणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. नवरात्रपाठोपाठ येणारे दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण आणि आगामी लग्नसराईचा हंगाम पाहता बाजारात सोन्याची मागणी प्रचंड वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशा मोक्याच्या क्षणी सोन्याचे भाव घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरांमध्ये झालेली घसरण
आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 440 रुपयांनी स्वस्त झाला असून त्याची नवी किंमत 1,50,980 रुपये इतकी झाली आहे, तर 1 ग्रामचा दर 15,098 रुपये नोंदवला गेला आहे. 22 कॅरेट सोने प्रति तोळा 400 रुपयांनी स्वस्त होऊन 1,38,400 रुपयांवर आले असून, त्याचा प्रति ग्राम दर 40 रुपयांनी घटून 13,840 रुपये झाला आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा 330 रुपयांची घसरण झाली असून त्याचा 10 ग्रामचा दर 1,13,240 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात फारसा परक पडलेला नाही. काल (11 ऑक्टोबर) चांदी 2,40,000 रुपये प्रतिकिलो होती. तर, आज (12 ऑक्टोबर) यात फक्त 100 रुपयांचा फरक पडला असून आजचा दर 2,39,900 रुपये प्रतिकिलो आहे.
हेही वाचा – रुपयाची घसरण रोखण्यासाठी RBI ॲक्शन मोडमध्ये; तेल कंपन्यांसाठी ‘स्पेशल डॉलर विंडो’ सुरू
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे आजचे दर
राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचे प्रतिग्रॅम ताजे दर खालीलप्रमाणे नोंदवले गेले आहेत:
मुंबई आणि पुणे: मुंबई व पुणे शहरात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 15,141 रुपये, 22 कॅरेटचा दर 13,879 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11,356 रुपये इतका आहे.
जळगाव, ठाणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि कोल्हापूर: या सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 15,098 रुपये, 22 कॅरेटचा दर 13,840 रुपये तर 18 कॅरेट सोन्याचा दर 11,324 रुपये नोंदवला गेला आहे.
वसई-विरार आणि भिवंडी: वसई-विरार व भिवंडी परिसरात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 15,101 रुपये, 22 कॅरेटचा दर 13,843 रुपये आणि 18 कॅरेटचा दर 11,327 रुपये आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी ठरणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
सणांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही दरातील घसरण खरेदीदारांच्या पूर्णपणे पथ्यावर पडणार आहे. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे यंदा नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.